एक्स्प्लोर

Ajit Pawar : बीडमध्ये एकाच घराण्याची मक्तेदारी, आता मला पाच वर्षे संधी द्या; अजितदादांची बीडकरांना भावनिक साद

Ajit Pawar Beed Speech : अनेक योजनांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले अशा लोकांच्या हाती तुम्ही सत्ता का देता? चांगल्या लोकांना निवडून का देत नाही? असा प्रश्न अजित पवारांनी बीडकरांना विचारला.

Beed Election : बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही क्षीरसागरांना संधी दिली, मला फक्त पाच वर्षे संधी द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून केलं. बीडच्या विकासासाठी अजित पवार जीवाचं रान करेल, चांगली संधी तुम्हाला चालून आली आहे अशी साद अजितदादांनी बीडकरांना घातली. दरम्यान, राष्ट्रवादी सोडून नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर देखील अजित पवारांनी थेट टीका केली.

बीड शहर जिल्ह्याचे ठिकाण अनेक वर्षांपासून एका घराण्याची मक्तेदारी आहे. त्यातूनच कोणीतरी नगराध्यक्ष व्हायचा. मात्र बारामतीच्या धरतीवर बीडचा विकास करू असा शब्द अजित पवारांनी यावेळी दिला. बीडमध्ये कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी पवारांनी दिला.

Ajit Pawar Beed Speech : पक्ष तुमच्या काकाचा आहे का?

अजित पवारांनी योगेश क्षीरसागरांवर जोरदार टीका केली. 53 उमेदवार निवडणुकीसाठी उभे करण्यासाठी मला एबी फॉर्म द्या अशी मागणी करण्यात आली. मात्र पक्ष तुमच्या काकाचा आहे का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित करत क्षीरसागरांवर निशाणा साधला. उमेदवारी देताना चार चौघांशी चर्चा करावी लागते, शंका आली तर पोलिसांकडून रिपोर्ट मागवतो. आता आम्ही दिलेले उमेदवार कुठे चुकले तर मला विचारायचं असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar On Yogesh Kshirsagar : अशा लोकांच्या हाती सत्ता का देता?

मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तेव्हा पाहिले की सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे होते. तुम्ही असल्या लोकांच्या हातात कशी सूत्रं देता? चांगल्या लोकांच्या हातात सत्ता का देत नाही? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे या नायब तहसीलदार आहेत, त्यांना एकदा संधी द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

बीड शहर रोजच्या रोज झाडले जात नाही. आठ दहा दिवसांनी पाणी मिळते, असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही होता. भ्रष्टाचाराने पोखरलेलं आणि जाऊ तिथे खाऊ असे वेगळेच राजकारण आहे. या लोकानी बीडचं वाटोळं केलं. पाणीपुरवठ्याच्या योजना आणल्या, त्यात देखील भ्रष्टाचार केला. त्या चांगल्या केल्या असत्या तर बीडकराना पाणी मिळालं असतं. ज्यांच्या हातात बीडची सूत्रं त्यांनी त्याचे वाटोळे केलं. पण मी आता ही परिस्थिती बदलणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget