एक्स्प्लोर

Dhananjay Deshmukh : निवडणुकीच्या काळात मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण, धनंजय देशमुखांचा हल्लाबोल, चुकीची कामं बंद झाल्यामुळे....

Santosh Deshmukh Murder Case : एका निष्पाप माणसाला संपवलं यापेक्षा चुकीची कामं करणारे आपले सहकारी तुरुंगात आहेत याची चिंता लोकप्रतिनिधींना आहे अशी टीका धनंजय देशमुखांनी केली.

बीड : राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) माजी मंत्री धनंजय मुंडेंना आठवण आली. नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करताना धनंजय मुंडे यांनी तसं वक्तव्यही केलं. आता त्याच वक्तव्यावरुन संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी मुंडेंवर टीका केली. चुकीची कामं बंद झाल्यामुळे आरोपी सहकाऱ्याची लोकप्रतिनिधींना उणीव भासते अशी टीका धनंजय देशमुखांनी (Dhananjay Deshmukh) केली.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे खंडणीचे प्रकरण होते. धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथिदारांनी संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhananjay Munde On Walmik Karad : काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलं. 'गेल्या 10 महिन्यांपासून बीडमध्ये जगमित्र कार्यालय सुरू आहे. पण आज इथे एक माणूस नाही' असं धनंजय मुंडे म्हणाले. यामुळे धनंजय मुंडे यांना उणीव भासत असलेला तो माणूस म्हणजे वाल्मिक कराड आहे अशी चर्चा सध्या बीडमध्ये रंगत आहे.

Dhananjay Deshmukh On Dhananjay Munde : चुकीची कामं बंद झाल्याने उणीव

धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यावर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी टीका केली. ते म्हणाले की, "एवढे दिवस ते अंग झटकत होते, या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, हे प्रकरण मला माहीत नाही असं म्हणत होते. पण आताच्या त्यांच्या भूमिकेवरुन त्यांना सगळ्या गोष्टीची जाण असल्याचं स्पष्ट होतंय. ही गोष्ट जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं बोलली गेली आहे. त्यांचे ते सगळे सहकारी चुकीची कामं करायची, खंडणी गोळा करायचे. या सगळ्या चुकीच्या गोष्टींची स्पष्टोक्ती या लोकप्रतिनिधींनी दिली. ते यांच्या एवढे जवळचे आहेत की, चुकीची कामं करुनही त्यांना उणीव भासत आहे.

ज्यांनी पाप केलं त्यांना शिक्षा मिळणारच. एका निष्पाप माणसाला संपवलं यावर जास्त चर्चा न करता, एक आरोपी कसा गुंतला, त्याची उणीव कशी भासते याची त्यांना जास्त चिंता आहे असं धनंजय देशमुख म्हणाले.

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडची उणीव

दरम्यान, गेल्या वर्षभरात परळीची बदनामी झाली असून काय चुकलं, काय नाही हे न्यायालय ठरवेल असही धनंजय मुंडेंनी म्हटलं. वाल्मिक कराडचं नावं मुंडेंनी घेतलं नसलं तरीही नगरपरिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना कराडची उणीव भासत असल्याची जोरदार चर्चा आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget