ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन; बीडमध्ये रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू
Professor Shravan Giri Death: बीडमध्ये रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचा अपघाती मृत्यू
Professor Shravan Giri Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी (Senior Literary and Famous Narrator Professor Shravan Giri) यांचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाला आहे. बीडमध्ये (Beed News) रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन गिरी यांचा मृत्यू झाला. श्रावण गिरी हे कर्जत (Karjat News Updates) येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला (Aurangabad News) आले होते. काम आटोपून कर्जतला परतताना त्यांचा अपघात झाला.
बीडमध्ये ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपना ट्रॅव्हल्सनं त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातल्या घाटनांदुर गावचे असलेले प्राध्यापक श्रावण गिरी हे कर्जत येथे प्राध्यापक म्हणून रुजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून ते कर्जतला परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
रविवारी संध्याकाळी औरंगाबाद वरून कर्जतला जाण्यासाठी ते बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते. तिथून ट्रॅव्हल्सने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना सपना ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे गिरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) दररोज किमान वीस ते पंचवीस ट्रॅव्हल्स उभ्या असतात. रस्त्याच्या मध्येच उभं राहून ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी चढतात आणि उतरतात. यामुळे वाहतूक कोंडी होतेच, पण यामुळेच अनेकवेळा अपघात होतात. यापूर्वीही अनेक अपघा झाले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने आज प्राध्यापक श्रावण गिरी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकात उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करणं आवश्यक आहे. यासंदर्भातील मागणीही यापूर्वी अनेकदा झाली आहे.