एक्स्प्लोर
Beed ZP Election | बीडमध्ये पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, झेडपीवर राष्ट्रवादीचा झेंडा
राज्यातील सत्तास्थापनेनंतर महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्न करत आहे. कोल्हापूर, नाशिकनंतर आता बीड जिल्हा परिषद देखील भाजपच्या ताब्यातून गेली आहे.
![Beed ZP Election | बीडमध्ये पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, झेडपीवर राष्ट्रवादीचा झेंडा Beed ZP election Result NCP Won Pankaja Munde against Dhananjay munde Beed ZP Election | बीडमध्ये पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, झेडपीवर राष्ट्रवादीचा झेंडा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/04164418/beed-Zp-s.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील मोठा धक्का दिला आहे. बीड झेडपीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची निवड झाली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार अधिकृत निकाल 13 तारखेला जाहीर होणार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना, भाजप बंडखोर आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मदत केल्यामुळे आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बीड जिल्हा परिषदमध्ये सत्ता परिवर्तन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या पाच सदस्यांनी भाजपला उघड मदत केली होती. त्यानंतर पाच सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. या सदस्यांनी यावेळी मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर 13 जानेवारी रोजी सुनावणी झाल्यावर अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करावा असे आदेश न्यायालयाने दिले होते.
दरम्यान शनिवारी झालेल्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे 22, काँगेसचे 3, शिवसेनेचे 4 आणि भाजपच्या बंडखोर 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 32 मतं मिळाली. त्यामुळे शिवकन्या सिरसाट या अध्यक्ष तर बजरंग सोनवणे हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आधीच माघार घेतली होती. राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही आहे. त्यामुळे लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहे, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. राज्यातील सत्तास्थापनेनंतर महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्न करत आहे. कोल्हापूर, नाशिकनंतर आता बीड जिल्हा परिषद देखील भाजपच्या ताब्यातून गेली आहे.
असं आहे बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल -
भाजप - 17
राष्ट्रवादी - 23
अपक्ष-निंबाळकर 1
शिवसंग्राम 4
शिवसेना 4
काँग्रेस 2
मुंदडा गट 1
रामदास बडे 1
पोटनिवडणूक - 2
अपात्र सदस्य - 5
एकूण - 60
महाविकासआघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरशी -
राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्र विकास आघाडी स्थानिक संस्थामध्येही आघाडी करताना दिसत आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपध्याक्ष पदासाठी निवडणुका सुरू आहे. कोल्हापूर, नाशिक आणि आता औरंगाबादमध्ये आघाडीतील पक्षांची सत्ता आली आहे. या सर्वच ठिकाणी भाजपची सत्ता होती. काल जळगावमध्ये खडेस-महाजन यांनी आपला गड राखला. तर, आज पंकजा मुंडे यांनी माघार घेतल्याने बीड जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून निसटणार आहे.
संबंधित बातम्या -
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतून पंकजा मुंडेंची माघार
![Beed ZP Election | बीडमध्ये पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, झेडपीवर राष्ट्रवादीचा झेंडा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/04164434/beed-zp.jpg)
खडसेंनी मिळवलं, पंकजांचं काय? बीड जिल्हा परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी धनंजय मुंडे यांची खेळी
आरोप-प्रत्यारोपानंतर खडसे, फडणवीस आणि महाजन जळगावमध्ये एकत्र, झेडपीवरही भाजपचा झेंडा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)