बजाजच्या IPO बाबत मोठी अपडेट, समोर आली महत्त्वाची माहिती; गुंतवणुकीसाठी कमीत कमी...
बजाज हाऊसिंग फायनान्स हा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी जवळ कमीत कमी किती रुपये असायला हवेत, असे विचारले जात होते.

मुंबई : लवकरच बाजाज उद्योग समुहाशी निगडित आणखी एक कंपनी लवकरच शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. त्याआधी या कंपनीत आयपीओच्या रुपात गुंतवणुकीची चांगली संधी निर्माण झाली आहे. पुढच्या आठवड्यात या कंपनीच्या आयपीओत गुंतवणूक करता येणार असून बजाज हाऊसिंग फायनान्स असे या कंपनीचे नाव आहे. दरम्यान, आता या कंपनीने आयपीओसाठी किमत पट्टा (प्राईज बँड) जाहीर केला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे आता गुंतवणूकदारांना किती पैसे गुंतवावे लागतील. एका लॉटसाठी किती पैसे लागतील? याचा अंदाज यायला मदत होणार आहे.
बजाज कंपनीचे 'हे' शेअर्स अगोदरच सूचिबद्ध
बाजाज उद्योग समुहाचे दोन शेअर्स याआधीच शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत. या दोन्ही शेअर्सचे नाव बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह असे आहे. हे दोन्ही शेअर्स भारतातील मोठ्या शेअर्सपैकी एक समजले जातात. आता बजाज उद्योग समुहाचा बजाज हाउसिंग फायनान्स हा आयपीओ येत आहे.
आयपीओचा किंमत पट्टा काय असेल?
बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीने सांगितल्यानुसार या कंपनीच्या आयपीओचा किंमत पट्टा 66-70 रुपये असेल. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 214 शेअर्स असतील. म्हणजेच बजाज हाऊसिंग फायनान्स या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 14,980 रुपये असणे गरजेचे आहे. किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओत जास्तीत जास्त 13 लॉट म्हणजेच 1 लाख 94 हजार 740 रुपयांची गुंतवणूक करू शकतील.
बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ किती मोठा?
बजाज हाऊसिंग फायनान्सचा हा आयपीओ एकूण 6,560 कोटी रुपये आहे. यात 3,560 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स इश्यू केले जातील. तर 3 हजार कोटी रुपयांचे शेअर्स हे ऑफर फोर सेल असतील. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी खुला होईल. या आयपीओत 11 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येईल. गुंतवणूकदारांच्या खात्यात 13 सप्टेंबरपर्यंत शेअर्स क्रेडिट केले जातील. हा आयपीओ शेअर बाजारावर 16 सप्टेंबर रोजी लिस्ट होईल.
हेही वाचा :
निवृत्तीनंतर खिशात असतील तब्बल 1 कोटी रुपये, नोकरीवर असताना फक्त 'हा' फंडा वापरा!
या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, 'हे' स्टॉक्स होणार एक्स डिव्हिडेंड!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
