एक्स्प्लोर

Bacchu Kadu : अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..

Buldhana Farmer Protest : अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक, अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी सरकारवर प्रहार केला आहे.

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद (Buldhana Shetkari Hakk Parishad) पार पडली. या परिषदेत माजी आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) , राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar), ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार (Deepak Kedar) उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही असं सांगतात. मग आत्महत्या का करतो? अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक, अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त करत च्चू कडू यांनी सरकारवर प्रहार केला आहे. या परिषदेत दीपक केदार यांनीही सरकारवर शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरवत संताप व्यक्त केला.

Farmer Protest : .....तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात

ही वेदनाची परिषद, दुःखाची परिषद आहे. दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे. तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात. मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. या सरकारने शेतकऱ्यांना भगवा हिरवा निळा रंगात वाटलं आणि त्यामुळे शेतकरी वाटल्या गेला. शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं, मलाही शेतकऱ्यांनीच पडलं. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही. असे हि च्चू कडू यावेळी म्हणाले.

Bacchu Kadu : तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते

लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला भाव मागितला का? सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही जात पाहिली. पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं.तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला तर गुढग्यावर येईल सरकार. पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा. मरण्यापेक्षा लढणे सुरू करा. आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खा गाव सुखी होऊ शकेल. असेही च्चू कडू यावेळी म्हणाले.

....अन् आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी

शेतकऱ्यांना जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. मोदींनी शंभर लाख गाठी कापसाच्या अमेरिकेतून मागितल्या आहे. कुठे मीडियात बातमी आहे का? या मीडियावाल्यांचे अर्धे मालक भाजपचे आहे. जोपर्यंत मातीची किंमत होत नाही तोपर्यंत जग सुधरत नाही. गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहर श्रीमंत होतील, अस यांचे हे तत्व आहे. 28 तारखेला आपण नागपूरला जाणार. पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिने आंदोलन करून काळे कायदे रद्द करायला लावले आणि आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी. जेवढी शेतात मेहनत करता त्याच्या एक टक्के आंदोलनात मेहनत करा आणि तुमचं काम होईल. जेव्हा सगळ्या रंगाचे झेंडे घेऊन शेतकरी लढेल त्यावेळेस सुखाचे दिवस येतील. असा विश्वास यावेळी बोलताना च्चू कडू यांनी व्यक्त केला. 

ही बातमी वाचा:

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget