एक्स्प्लोर

Bacchu Kadu Hunger Strike : बच्चू कडूंची प्रकृती खालावली, वजन 4 किलोने घटलं, शरद पवारांचा फोन, मनोज जरांगे भेट घेणार, कुणाकुणाचा पाठिंबा?

Bacchu Kadu Hunger Strike :  प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा (Bacchu Kadu Prahar Andolan) आजचा चौथा दिवस असून बच्चू कडूंची प्रकृती आता खालावली आहे.

Bacchu Kadu Hunger Strike :  प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadun) यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरले आहे. दरम्यान त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा (Bacchu Kadu Prahar Andolan) आजचा चौथा दिवस असून बच्चू कडूंची प्रकृती आता खालावली आहे. अशातच आरोग्य विभागाच्या पथकाकडून बच्चू कडू यांची तपासणी केली असता कडू यांचे वजन 4 किलोने कमी झाले आहे. तर रक्तदाब वाढलेला आहे. तीवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी केली गेलीय. असं असलं तरी बच्चू कडू यांनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे. 

आम्ही जिवंत आहोत हे आम्हाला सांगायचंय- बच्चू कडू

मी पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो. हे आंदोलन तीन उद्देशासाठी आम्ही करत आहे. आम्ही जिवंत आहोत हे आम्हाला सांगायचं आहे. जो शेतकरी जाती धर्मामध्ये विभागलेला आहे. पण त्याने शेतकरी म्हणून जगावं, त्याचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन आहे आणि तिसरे आम्ही सरकारला सध्या काय स्थिती आहे, हे आम्ही सांगितले पाहिजे, शेतमाल भाव घसरले आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन करत बच्चू कडू यांनी या अन्नत्याग आंदोलनावर भाष्य केलं आहे.

आम्ही मरण पत्करू पण झुकणार नाही

दरम्यान, आम्ही मंत्री असतानाही शेतकऱ्यांचा आवाज उचलला. काल पालकमंत्री बावनकुळे यांचं दमदाटी सारखं वागले, याचा आम्ही निषेध करतो. आम्ही मरण पत्करू पण झुकणार नाही. आज मनोज जरांगे, रोहित पवार येताय. यांच्याकडून मला अपेक्षा आहे की या आंदोलनाचे परिणाम राज्यात उमटले पाहिजे. बावनकुळे म्हणाले की, आम्ही पाच वर्षात केव्हाही कर्जमाफी देणार. पण केव्हा देणार हे त्यांनी सांगावं. मुख्यमंत्री मागणी पूर्ण करत नाहीये. तुम्हाला जाहीर करावंच लागेल. असंही  बच्चू कडू म्हणाले. मुख्यमंत्री साहेब रोज आत्महत्या होताय. मंदिरात जरी तुम्ही पुण्य कमावलं असेल पण या राज्यात आत्महत्या झालेल्याचं पाप कुठं फेडणार. असेही  बच्चू कडू म्हणाले.

शरद पवारांचा फोन, मनोज जरांगे भेट घेणार

दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून ही बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन केलं जात आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते नितेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचे फोन वर बोलणं करून दिलं. यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा वडीलकीचा सल्ला दिलाय. अशातच राज्यातील इतर नेते देखील आज  कडूंच्याआंदोलन स्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोल्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत प्रहारचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.  दरम्यान, मला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी माझे कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आंदोलन करतीलच, सभेत काळे झेंडे दाखविले जाणारच, असा इशारा प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिला आहे. 

प्रहारच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय?

1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.

2. दिव्यांग व विधवा महिलांना रु. 6000/- मानधन देण्यात यावे.

3. आपत्कालीन संकटमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे तसेच शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावे.

4. दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिबृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे.

5. वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे.

6. शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.

7. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

8. रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपीकांत 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावे. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रु. 1000/- मजुरी दिली जावी.

9. संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी.

10. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी.

11. 100% दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावे.

12. शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग (OBC) चे आरक्षण 27% ठेवावे.

13. शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे.

14. शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावे.

15. शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचे बील माफ करून सतत वीजपुरवठा करण्यात यावा.

16. शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी.

17. धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local Masjid Bander : दोषींना वाचवण्यासाठी निष्पापांचा बळी Special Report
Mahayuti Rift: 'भाजप (BJP) मित्रपक्षांना गिळणारा राक्षस आहे', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा घणाघात
Parth Pawar Land Deal : पार्थच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांनी हात झटकले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Embed widget