(Source: Poll of Polls)
मंत्री छगन भुजबळ वडिलांच्या भूमिकेत, त्यांनी तसं करायला नको होतं; वडेट्टीवारांच्या महाएल्गार सभेतील व्हिडिओ प्रकरणी बबनराव तायवाडेंची नाराजी
एखाद्या नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर चव्हाट्यावर आणणे योग्य नाही, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी बोलून दाखवली.

Babanrao Taywade: मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसी समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत, एका प्रकारे ते वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर चव्हाट्यावर आणणे योग्य नाही, भुजबळ साहेबांनी (Chhagan Bhujbal) तसं करायला नको होतं. अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांनी बोलून दाखवली. ते नागपुरात (Nagpur) बोलत होते.
Babanrao Taywade: वडेट्टीवार यांच ते वक्तव्यही चुकीचं होतं. मात्र...
बीडच्या महाएल्गार सभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी तायवाडे यांनी हि नाराजी व्यक्त केलीय. काल बीड मधील महाएल्गार सभेत वडेट्टीवार यांचा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सोबतचा जुना व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये वडेट्टीवारांनी तेव्हा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे, या मागणीचं समर्थन केलं होतं. वडेट्टीवार यांच ते वक्तव्यही चुकीचं होतं. मात्र त्याचा अर्थ असा नाही की वारंवार ती चूक सर्वांसमोर आणायला हवी, असेही तायवाडे म्हणाले. ओबीसी समाजातील नेत्यांमध्ये दुर्दैवाने फूट पडल्याचे चित्र निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
Babanrao Taywade on Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी नागपुरात एवढा मोठा ओबीसी मोर्चा घेऊन दाखवला
भुजबळ वरिष्ठ नेते असल्यामुळे ते वडिलांच्या भूमिकेत आहे. त्यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) एकट्यात बोलावून ती चूक सांगायला हवी होती, अशी अपेक्षाही तायवाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी नागपुरात एवढा मोठा ओबीसी मोर्चा घेऊन दाखवला. त्यांच्याशिवाय विदर्भात एवढी ताकद कोणाची आहे, हे विसरून चालणार नाही. असंही तायवाडे म्हणाले.
Laxman Hake : ओबीसी समाजाचा मेळावा "ना भूतो न भविष्यति"
बीडमध्ये झालेला ओबीसी समाजाचा मेळावा ना भूतो न भविष्यती असा होता. भुजबळ साहेब काल ओबीसींचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आपल्यामध्ये असणारे हेवेदावे संवाद करून मिटून टाकूया आणि ओबीसी समाजाचा आरक्षण वाचवायाला हवे, असं मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडलं आहे. ओबीसी समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि आरक्षण संपण्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे, असं हाके म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:



















