एक्स्प्लोर

झेलियो ई-बाइक्सची नवीन Eeva सीरीज लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Eeva Electric Bike Price : इवा सिरीजमध्ये Eeva, Eeva Eco आणि Eeva ZX+ मॉडेलचा समावेश असून ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास अनुकूल अशी बाईक बाजारात आणली आहे. 

मुंबई : भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील अग्रेसर कंपनी असलेल्या झेलियो ईबाईक्सने आपली नवीनतम श्रेणी, Eeva सीरीज लाँच करण्याची घोषणा केली आहे. 56,051 आणि 90,500 (एक्स-शोरूम) दरम्यानच्या किमतींसह, Eeva सीरीज द्वारे Eeva, Eeva Eco आणि Eeva ZX+ यासह तीन वेगळे मॉडेल ऑफर करण्यात आले आहे. ग्रेसी सीरीज आणि एक्स मेन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सारख्या पूर्वीच्या मॉडेल्सच्या यशावर आधारित, Eeva सीरीज विद्यार्थी, व्यावसायिक आणि तात्पुरत्या कामगारांसह शहरी प्रवाशांसाठी त्यांना हवी तशी नाविन्यपूर्ण, पर्यावरणास अनुकूल गतिशीलता उपाय पुरवण्यासाठी झेलियोची सतत वचनबद्धता दर्शवते.

Eeva मॉडेल हे, जशी पाहिजे तशी दैनंदिन शहरी गतिशीलता पुरवण्यासाठी तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये एक मजबूत बीएलडीसी मोटर (60/72व्ही), एकूण वजन 80 कि.ग्रॅ. आणि लोडिंग क्षमता 180 कि.ग्रॅ. आहे. ही स्कूटर समोरील आणि मागील दोन्ही बाजूस ड्रम ब्रेकसह सुसज्ज आहे, ज्यामुळे थांबण्याची विश्वसनीय शक्ती सुनिश्चित केली जाते.

खडबडीत पृष्ठभागांवरही सहजपणे प्रवास घडवून आणणाऱ्या हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बरचे रायडर्स कौतुक करतील. Eeva मध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जर आणि डिजिटल डिस्प्ले यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांचाही समावेश आहे, ज्यामुळे हा प्रवाशांसाठी एक हुशार पर्याय बनतो. इवा निळा, राखाडी, पांढरा आणि काळा या रंगांत उपलब्ध आहे.

Eeva Eco मध्ये, Eeva च्या पावलावर पाऊल ठेवून, दमदार कामगिरीसह स्टायलिश डिझाइनचे मिश्रण आहे. या मॉडेलमध्ये 80 कि.ग्रॅ. वजन आणि 180 कि.ग्रॅ. वजनाची भरीव लोडिंग क्षमता आहे, ज्यामुळे टिकाऊपणा आणि क्षमता दोन्हीची खात्री होते. मागील बाजूस ड्रम ब्रेक आणि पुढच्या बाजूला डिस्क ब्रेकसह सुरक्षितता वाढविली जाते, तर पुढची रिम मिश्र धातुपासून तयार करण्यात आली आहे.

Eeva Eco मध्ये, Eeva मध्ये असलेल्या रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच आणि यूएसबी चार्जर यांसारख्या वैशिष्ट्यांचा पूर्ण संच देखील आढळून येतो. ही स्कूटर 48/60 व्ही बीएलडीसी मोटरवर चालते आणि तिला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बर जोडलेले आहेत, शिवाय तिच्यात अतिरिक्त सुरक्षिततेसाठी डिजिटल डिस्प्ले आणि सेंट्रल लॉकिंग देखील आहे. Eeva Eco ही निळा, राखाडी, पांढरा आणि काळा आणि लाल या रंगाच्या चैतन्यपूर्ण पॅलेटमध्ये उपलब्ध आहे.

Eeva ZX+ मॉडेल हे, प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. हे एक मजबूत बीएलडीसी मोटर (60/72 व्ही), एकूण वजन 90 कि.ग्रॅ., आणि 180 कि.ग्रॅ. लोडिंग क्षमतेसह सुसज्ज आहे. ZX+ मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील ड्रम ब्रेकची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे असाधारण नियंत्रण आणि सुरक्षितता सुनिश्चित होते. या मॉडेलमध्ये Eeva आणि Eeva Eco च्या सर्व प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जसे की अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जर आणि डिजिटल डिस्प्ले. Eeva ZX+ निळा, राखाडी, पांढरा आणि काळा या रंगात उपलब्ध आहे.

झेलियो ईबाईक्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, “Eeva सीरीजची ओळख भारतातील शहरी गतिशीलता बदलण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. आमच्या पूर्वीच्या लो-स्पीड मॉडेल्सच्या यशावर आधारित, ज्यांना त्यांच्या विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आम्ही विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी वर्धित श्रेणी ऑफर करण्यास उत्सुक आहोत. Eeva सीरीज सुधारित सुरक्षा यंत्रणा, आधुनिक डिझाइन घटक आणि उच्च कार्यक्षमता यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांना एकत्रित करते, ज्यामुळे लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर विभागात नवीन मापदंड स्थापित केला जातो."

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget