एक्स्प्लोर

Tiguan Facelift Review: ड्युअल हॉट सीट, 18- इंच अलॉय व्हील आणि दमदार इंजिन; टिगुआन फेसलिफ्ट एसयूव्हीची जोरदार चर्चा

Tiguan Facelift Review: फोक्सवॅगननं यावर्षी नवीन टिगुआन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीनं आणखी एका एसयूव्ही कारच्या लॉन्चिंगची घोषणा केलीय.

Tiguan Facelift Review: फोक्सवॅगननं यावर्षी नवीन टिगुआन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीनं आणखी एका एसयूव्ही कारच्या लॉन्चिंगची घोषणा केलीय. टिगुआन एक मिडसाईज प्रीमिअम एसयूव्ही आहे आणि भारतीय बाजारात याआधीही या कारची विक्री झालीय. नवीन टिगुआन अधिक अग्रेसिव्ह आणि प्रीमियम लूकमध्ये मिळत आहे. ही एसयूव्ही कार बाजारात दाखल होताच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळवेल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. 

इंटीरिअर आणि व्हील साइज
या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. एवढेच नव्हेतर, रिअर स्टाईललाही नव्या एलईडी टेल-लॅम्प आणि नवीन बंपरसह अपडेट करण्यात आलंय. यात 18 इंचाचे अलॉय व्हील देखील देण्यात आले आहे. तसेच या कारमध्ये आकर्षित असे कलर पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. कारमध्ये स्टीयरिंग व्हीलच्या फिनिशिंगपासून सॉफ्ट टच मटेरियलपर्यंत सर्व काही उच्च दर्जाचे आहे. कारच्या केबिनचे डिझाईन कंजर्वेटिव्ह वाटू शकतात. परंतु, याची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. 

इन्फोटेनमेन्ट सिस्टम
टीगआन कारमध्ये नव्या इन्फोटेनमेन्ट सिस्टमसह 8 इंचचा टचस्क्रीन देण्यात आला आहे. तर, नवीन इंस्ट्रमेन्ट क्लस्टरदेखील डिजीटल आहे. टचस्क्रीनचा फीडबॅकही चांगला आहे. तसेच या कारसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या मेन्यूसह टच रिस्पॉन्सही ग्राहकांना पसंत येत आहे. 

फीचर्स
ही एक पूर्णपणे लोड केलेले मॉडेल आहे.  स्पर्धकांच्या तुलनेत या कारमध्ये बऱ्याच आकर्षित गोष्टी मिळतात. यूएसबी सी पोर्ट, पॅनोरामिक सनरूफ, थ्री झोन ​​क्लायमेट कंट्रोल, 30 मूड लाइटिंग पर्यायांसह एम्बिएन्ट लायटिंग, लेदर अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि हॉट सीट्ससह बरेच काही आहे. जेव्हा एक रिअर व्ह्यू कॅमेरा असतो, त्यावेळी 360 डिग्री कॅमेरा अपेक्षित असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीनं तुम्हाला 6 एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ऑटो होल्ड इत्यादी गोष्टी मिळतात. 

इंजिन आणि पॉवर
टीगआनच्या मागील कारच्या तुलनेत नव्या कारमध्ये टर्बो पेट्रोल 2.0-लिटर इंजिन आहे. जे 190 पीएस पॉवर आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यासह, गिअरबॉक्स 7-स्पीड DSG तसेच 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे. 

किंमत
31.9 लाख रुपये किमतीची टीगआन थोडी महाग आहे, पण चांगली प्रीमियम एसयूव्ही आहे. तसेच परफॉर्मस क्वालिटी आणि फिचर्सही दमदार आहेत. ही कार एका महागाड्या एसयूव्ही कारसारखी दिसते. ज्यामुळं या कारची किंमती थोडी जास्त आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget