Upcoming Maruti Cars: मारुती घेऊन येत आहे 3 जबरदस्त कार, सीएनजी मॉडेलचाही असेल समावेश
Upcoming Maruti Cars: मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेत तीन नवीन कार आणण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये पहिले मॉडेल Brezza SUV चे CNG व्हर्जन असेल.
Upcoming Maruti Cars: मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेत तीन नवीन कार आणण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये पहिले मॉडेल Brezza SUV चे CNG व्हर्जन असेल. यानंतर कंपनी मे-जून 2023 पर्यंत फ्रँक्स क्रॉसओवर आणि जिम्नी लाईफस्टाईल SUV लॉन्च करू शकते करेल. चा तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ..
Upcoming Maruti Cars: मारुती ब्रेझा सीएनजी
मारुती सुझुकीने जानेवारी 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये आपल्या कॉम्पॅक्ट SUV Brezza ची CNG आवृत्ती प्रदर्शित केली होती आणि आता कंपनीने ही कार लॉन्च केली आहे. याचे बुकिंग आधीच सुरू झाले होते. सीएनजी किटसह येणारी ही या सेगमेंटमधीलपहिली कार आहे. याला ग्रँड विटारा, एर्टिगा आणि XL6 प्रमाणेच 1.5-लीटर पेट्रोल-CNG इंजिन मिळते. CNG मोडमध्ये हे इंजिन 87.5PS पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करेल. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार 25.51km/kg मायलेज देण्यास सक्षम आहे. Brezza CNG 4 प्रकारांमध्ये आणले गेले आहे - LXI, VXI, ZXI आणि ZXI ड्युअल टोन, ज्याची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 9.14 लाख रुपये ते 12.06 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारमधील इतर सर्व काही पेट्रोल मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आले आहे.
Upcoming Maruti Cars: मारुती सुझुकी फ्रँक्स
मारुती सुझुकीने आधीच कूप एसयूव्ही फ्रँक्सचे बुकिंग सुरू केले आहे. ही कार एप्रिल 2023 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. याची किंमत 7 लाख ते 11 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार बाजारात निसान मॅग्नाइट आणि रेनॉ किगरला टक्कर देईल. यामध्ये बलेनोप्रमाणेच बहुतांश इंटीरियर एलिमेंट्स आणि फीचर्स पाहायला मिळतील. या कारमध्ये 2 इंजिनचा पर्याय असेल. ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT ट्रान्समिशनसह 1.2L NA पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध असेल.
Upcoming Maruti Cars: मारुती सुझुकी जिमनी
मारुती सुझुकी आपली नवीन लाइफस्टाइल SUV जिमनी मे 2023 पर्यंत लॉन्च करू शकते. याची विक्री NEXA डीलरशिपद्वारे केली जाईल. कंपनीने 25,000 रुपयांच्या टोकन रकमेने बुकिंग सुरू केले आहे. कार Zeta आणि Alpha या दोन ट्रिम लेव्हलमध्ये येईल. जिमनी 5-डोरला आयडल स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह 1.5-लीटर K15B 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 103bhp पॉवर आणि 134.2Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडले जाईल. ही कार सुझुकी ऑल ग्रिप प्रो 4 व्हील ड्राइव्ह प्रणालीसह मॅन्युअल ट्रान्सफर केस आणि 2WD हाय, 4WD हाय आणि 4WD-लो मोडसह सुसज्ज असेल.
Upcoming Maruti Cars: या कारशी होणार स्पर्धा
मारुती जिमनी भारतीय बाजारपेठेत महिंद्र थारशी स्पर्धा करेल, जी पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. यात रियर व्हील ड्राइव्ह आणि 4×4 ड्राइव्हट्रेनचा पर्याय आहे.