येत आहे Toyota ची नवीन SUV, कंपनीने केला व्हिडीओ शेअर
Toyota Upcoming Cars: नवीन Scorpio-N आज भारतात लॉन्च झाली आहे. यानंतर आता आगामी टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर (Toyota Urban Cruiser Hyryder) चीही खूप चर्चा होत आहे.
Toyota Upcoming Cars: नवीन Scorpio-N आज भारतात लॉन्च झाली आहे. यानंतर आता आगामी टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर (Toyota Urban Cruiser Hyryder) चीही खूप चर्चा होत आहे. ही कार 1 जुलै रोजी लाँच होण्याआधी, टोयोटाने अधिकृतपणे आगामी Hyryder SUV च्या इंटिरियरचा टीझर प्रसिद्ध केला आहे.
या शॉर्ट व्हिडीओमध्ये काळ्या आणि तपकिरी तसेच सिल्व्हर अॅक्सेंटसह ड्युअल-टोन फिनिश दिसत आहे, जी SUV ला सॉफ्ट-टच फिनिश आणि अपमार्केट फील देते. या नवीन फिनिशसह, टीझरमध्ये दिसत असल्या प्रमाणे नवीन लॉन्च केलेल्या मारुती सुझुकी मॉडेलवर उपलब्ध असणारी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देखील टोयोटाच्या या नवीन कारचा एक भाग असेल. ज्यामध्ये काही रिमोट फंक्शन्ससह कनेक्टेड कार तंत्रज्ञान असेल.
या टिझर व्हिडिओत कारमधील काही आतील भाग देखील दिसत आहे. याचा आतील भागात मारुती सुझुकीकडून घेतलेले काही फीचर्स दिसत आहे. HVAC कंट्रोल्स प्रमाणे आणि डॅशचे इतर भाग मारुती सुझुकी कारसारखेच आहेत. नवीन कारच्या स्प्लिट हेडलाइट डिझाइनची आणि त्याच्या ड्युअल-टोन पेंट स्कीमची झलक देखील या व्हिडीओत दिसत आहे. शार्प एलईडी डीआरएल नवीन टोयोटा हायराइडरच्या शीर्षस्थानी ठेवण्यात आले आहेत. तर मुख्य हेडलाइट्स खाली ठेवलेले दिसत आहे.
It’s #HYTime you were out and about, yet never out of reach. Stay tuned.#Hybridlife
— Toyota India (@Toyota_India) June 26, 2022
.
.#ToyotaIndia #awesome #ItsHYTime pic.twitter.com/TOyxsfsoLW
आगामी Urban Cruiser Hyryder मध्ये मारुती सुझुकीकडून घेतलेले 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. मारुतीच्या लाइनअपमध्ये उपलब्ध असलेल्या 103 bhp पेक्षा जास्त पॉवर देण्यासाठी याला फाइल-ट्यून केले जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mahindra Scorpio N : महिंद्रा कंपनीची सर्वात बहुप्रतिक्षीत कार Scorpio-N आज होणार लॉन्च; वाचा A to Z माहिती
- Mahindra Scorpio-N : बहुप्रतिक्षीत Mahindra Scorpio-N धमाकेदार फीचर्ससह लवकरच भारतात होणार लॉन्च; पाहा याचा Classy लूक
- Anand Mahindra Scorpio N : 'स्कॉर्पियो एन'मधील N म्हणजे काय? आनंद महिंद्रांना युझरचा प्रश्न, सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा