(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top Five Selling Cars : सणासुदीच्या काळात या 5 कारची होतेय बंपर विक्री; 'या' कारचा यादीत समावेश
Top Five Selling Cars : मारुती Wagon R कारला मागे टाकत Baleno कारची विक्री गेल्या महिन्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
Top Five Selling Cars : सध्या भारतात सणासुदीचे दिवस सुरु आहेत. दिवाळीसुद्धा अगदी काही दिवसांवर आली आहे. त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रातही वाढती हालचाल दिसून येत आहे. तसेच, या दरम्यान अनेक कार लॉन्च झाल्यामुळे अनेक ग्राहक कार बुकिंग आणि खरेदी करताना दिसत आहेत. तुम्ही सुद्धा या सणासुदीच्या दिवसांत कार विकत घेण्याचा विचार करत असाल. तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाच अशा कारबद्दल सांगणार आहोत ज्या बजेटफ्रेंडली तर आहेच पण त्याचबरोबर त्यांच्या विक्रीतही झपाट्याने वाढ होतेय.
मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) :
मारुती सुझुकी बलेनोने ऑगस्ट महिन्यात विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडून बाजारात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ऑगस्ट महिन्यात बलेनोच्या 18,414 कार विकून कंपनीने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. Maruti Baleno ची किंमत 6.49 लाख सी पासून सुरू होते आणि तिची एक्स शो रूम किंमत 9.71 लाख पर्यंत जाते.
मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki Wagon R) :
मारुती सुझुकी वॅगनआर ऑगस्टपूर्वी 4 महिन्यांच्या विक्रीत पहिल्या क्रमांकावर होती. त्यानंतर मात्र, ऑगस्टमध्ये ही जागा बलेनोने घेतली. ऑगस्टमध्ये मारुती वॅगनआरने 18,398 कार विकल्या. Maruti WagonR ची किंमत 544,500 लाख रूपयांपासून सुरू होते आणि तिची एक्स शो रूम किंमत 7,20,000 लाख रूपयांपर्यंत जाते.
मारुती सुझुकी विटारा ब्रिझा (Maruti Suzuki Vitara Brezza) :
सणासुदीच्या काळात मारुती सुझुकी विटारा ब्रिझा विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने विटारा ब्रिझाच्या 15,193 युनिट्सची विक्री केली. मारुती सुझुकी विटारा ब्रिझाची किंमत 7,99 लाख रुपये ते 13.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
टाटा नेक्सॉन (Tata Nexon) :
टाटा नेक्सॉन कारबद्दल बोलायचे झाले तर, ऑगस्ट महिन्यात 15,085 युनिट्सच्या विक्रीसह ती सर्वाधिक विक्रीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. Nexon च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 7,59,900 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13,94,900 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) :
ऑगस्ट महिन्यातील विक्रीत मारुती सुझुकी अल्टो ही कार पाच क्रमांकावर आहे. या कारने ऑगस्ट महिन्यात 14,388 कार विकल्या. अल्टोची किंमत 3.39 लाख रुपये ते 5.03 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
महत्वाच्या बातम्या :