'या' महिन्यात भारतात लॉन्च होणार तीन नवीन बाईक्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Upcoming Two Wheelers February 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीसह भारतीय बाजारपेठेत (indian auto industry) अनेक नवीन बाईक (Bike) लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.
Upcoming Two Wheelers February 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीसह भारतीय बाजारपेठेत (indian auto industry) अनेक नवीन बाईक (Bike) लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. Royal Enfield Super Meteor 650 आणि Hero Zoom सारख्या दुचाकी जानेवारी 2023 मध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत. अशातच आता फेब्रुवारीमध्ये आणखी काही नवीन मॉडेल्स बाजारात येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला आगामी दुचाकींबद्दल सांगत आहोत, ज्या फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकतात. चला तर जाणून घेऊ...
Upcoming Two Wheelers February 2023: मॅटर ड्राइव्ह 1.0
ई-वाहन स्टार्टअप मॅटर ईव्ही (Matter EV) भारतात आपली पहिली ई-बाईक लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मॅटर ड्राइव्ह 1.0 ई-बाईकचा खुलासा केला होता. या बाईकचे तंत्रज्ञान आणि फीचर्स पाहता सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या कोणत्याही ई-बाईकपेक्षा ती अधिक आधुनिक असेल. कंपनी या बाईकमध्ये लिक्विड कूल्ड मोटर आणि बॅटरी वापरत आहे. यासोबतच या ई-बाईकमध्ये पेट्रोल बाईकसारखे गिअरही दिले जात आहेत. मॅटर ई-बाईकची रेंज मॉडेलवर अवलंबून 125-130 किमी असण्याचा अंदाज आहे. मॅटर ई-बाईक कोणत्याही 150 सीसी पेट्रोल बाईकशी स्पर्धा करू शकते. कंपनीने याला अतिशय मस्क्युलर डिझाइन दिले आहे. मॅटर ई-बाईक 1.75 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत बाजारात आणली जाऊ शकते. लॉन्च झाल्यानंतर मॅटर ई-बाईक टॉर्क क्रॅटोस प्रीमियम इलेक्ट्रिक बाईकशी स्पर्धा करेल.
Upcoming Two Wheelers February 2023: Yamaha MT-15 V2 (BS-VI फेज-2)
एप्रिल 2023 पासून देशात BS-6 उत्सर्जन नियमांचा दुसरा टप्पा (फेज-2) लागू केला जाईल. अशा परिस्थितीत यामाहा आपल्या लोकप्रिय नेकेड बाईक MT-15 चे V2 व्हर्जन अपडेट करत आहे. नवीन MT-15 V2 ला नवीन इंजिन मिळेल, जे नवीन उत्सर्जन मापदंडांचे पालन करेल. नवीन MT-15 V2 बाईक यावर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Upcoming Two Wheelers February 2023: रिव्हर इलेक्ट्रिक स्कूटर
या वर्षी रिव्हर इलेक्ट्रिक भारतीय ई-वाहन बाजारपेठेत पाऊल टाकेल. इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करून कंपनी भारतात पदार्पण करेल. कंपनी जवळपास 2 वर्षांपासून आपल्या ई-स्कूटरची टेस्ट करत आहे आणि ती अनेक वेळा रस्त्यावर दिसली आहे. काही रिपोर्टनुसार, ही एक 'मल्टी युटिलिटी' इलेक्ट्रिक स्कूटर असेल जी 100 ते 180 किलोमीटरची रेंज देईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर अवघ्या चार सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग पकडू शकते. याचा टॉप स्पीड 80 किमी/तास असू शकतो.