(Source: ECI/ABP News/ABP Majha)
7 Seater Cars: 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, मोठ्या कुटुंबासाठी आहे बेस्ट
7-Seater Cars at Low Price : देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचं कुटुंब मोठं आहे आणि त्यांना 7 सीटर कार खरेदी करायची आहे. मात्र कमी बजेट असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही.
7-Seater Cars at Low Price : देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचं कुटुंब मोठं आहे आणि त्यांना 7 सीटर कार खरेदी करायची आहे. मात्र कमी बजेट असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. तुमच्या बाबतीतही असेच असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण वाहन बाजारात अशा अनेक 7 सीटर कार आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. यासोबतच यामध्ये जबरदस्त मायलेजही मिळतो. चला तर मग 7 सीटर पर्यायामध्ये उपलब्ध असलेल्या कारची संपूर्ण लिस्ट पाहूया.
मारुती सुझुकी इको
मारुतीची ही कार 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी 7 सीटर कार आहे. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावू शकते. तर त्याचे कमाल मायलेज 26 किमी प्रति किलो आहे. या कारच्या 5-सीटर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.10 लाख रुपये आहे. तर त्याच्या 7-सीटर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.42 लाख रुपयांपासून सुरू होते.
रेनॉल्ट ट्राइबर
रेनॉल्टची ही एमपीव्ही कार देशात खूप लोकप्रिय आहे. कारला 1.0 लीटर 3 सिलेंडर, Natural Aspirated पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 6-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ही फीचर्स आहेत. यासोबतच या कारमध्ये 84 लीटर बूट स्पेसही देण्यात आली आहे. या 7 सीटर कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी एर्टिगा
मारुती सुझुकीची एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कारपैकी एक आहे. या कारमध्ये माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज 1.5 लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. यात पेट्रोलसोबत सीएनजीचाही पर्याय आहे. हे इंजिन 103 PS पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार सीएनजीवर 26 किमी प्रति किलो मायलेज देते. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 8.41 लाख रुपये आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: