(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Best Cars Under 7 Lakh: 7 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात 'या' आलिशान कार आहेत, चार नंबर कारमध्ये मिळणार जबरदस्त सेफ्टी फीचर्स
Best Cars Under 7 Lakh in India: जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, पण तुमचे बजेट 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात.
Best Cars Under 7 Lakh in India: देशात वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याच एक महत्वाचं कारण म्हणजे, आता कमी किंमत अधिक चांगल्या कार उपलब्ध आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, पण तुमचे बजेट 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात.
टाटा पंच
वाहन उत्पदक कंपनी टाटा मोटर्सच्या micro SUV मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळते. जे 86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. कारला 187 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. या कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम 6 लाख रुपये आहे.
मारुती बलेनो
मारुतीच्या प्रीमियम हॅचबॅक कारला 1.2-लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन मिळते. जे 90 PS पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि फाइव्ह-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे. ही कार सीएनजी व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. या कारची किंमत 6.49 लाख रुपये आहे.
मारुती डिझायर
मारुती डिझायरमध्ये 1.2-लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 90 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजीवर हे इंजिन 77 पीएस पॉवर आणि 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी 5-स्पीड AMT मिळतो. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.24 लाख रुपये आहे.
टाटा अल्ट्रोझ
टाटाच्या या कारमध्ये तीन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 86 पीएस पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करणारे, 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. तसेच 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 110 पीएस पॉवर आणि 140 न्यूटन मीटर टॉर्क, 90 पीएस पॉवर आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन 200 न्यूटन मीटर उपलब्ध आहे. ही सर्व इंजिने 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) सह एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.24 लाख रुपये आहे.