एक्स्प्लोर

Walmik Karad Surrender : कुणालाही सोडणार नाही! वाल्मिक कराडच्या सरेंडरवर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Walmik Karad Surrender : 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on Walmik Karad Surrender : बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची 9 डिसेंबरला खून करण्यात आला. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या (Pune CID) कार्यालयात शरण आला. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतले जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू, असे त्यांनी म्हटले.  

फडणवीसांचे संतोष देशमुखांच्या भावाला आश्वासन

ते पुढे म्हणाले की, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माजी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की, तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असेही त्यांनी म्हटले. 

जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे

तर वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, कोणता गुन्हा दाखल होईल? कसा होईल? याबाबत सगळी माहिती पोलीस देतील. ते पोलिसांचे काम आहे. पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे.  या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?

वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrendered in Pune CID : वाल्मिक कराड CID ला शरण, पुण्यात समोर येताच काय घडलं?Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलंWalmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
Vijay Wadettiwar : पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!

Embed widget