Tata Punch CNG : टाटा पंच सीएनजी एसयुव्ही लाँच, जाणून घ्या गाडीचे भन्नाट फिचर्स आणि किंमत
दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकीच एक नाव म्हणजेच टाटा मोटर्स कार (Tata Motors Car). टाटा मोटर्सने आपली टाटा पंच ही कार आता सीएनजीमध्ये लाँच केली आहे.
Tata Punch CNG : दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकीच एक नाव म्हणजेच टाटा मोटर्स कार (Tata Motors Car). टाटा मोटर्सने सीएनजी एसयुव्ही रेंजमध्ये आणखी एका गाडीची भर पाडली आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी टाटा पंच सीएनजी एसयुव्ही आज बाजारात लाँच केली आहे. ही गाडी पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीकडून हे ड्युअल सीएनजी सिलेंडर देण्यात आले आहे. यामुळे बूट स्पेसमध्ये मोठी जागा मिळते. या गाडीची किंमत प्रतिस्पर्धी असलेल्या ह्युंदाई एक्स्टरच्या सीएनजी व्हेरियंटपेक्षा कमी आहे. टाटा पंच सीएनजी या व्हेरियंटची किंमत 7.10 लाखांपासून 9.68 लाखांपर्यंत (एक्स शोरुम) इतकी आहे. जाणून घेऊया गाडीचे भन्नाट फिचर्स आणि किंमत.
टाटा पंच सीएनजी व्हेरियंटची किंमत
टाटा पंच प्युअर : 7 लाख 9 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
टाटा पंच ॲडव्हेंचर : 7 लाख 84 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
टाटा पंच ॲडव्हेंचर रिदम : 8 लाख 19 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
टाटा पंच अकॉम्पलिश्ड : 8 लाख 84 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
टाटा पंच अकॉम्पलिश्ड डॅझल एस : 9 लाख 67 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
मिळतील दमदार फिचर्स
टाटा पंचच्या पेट्रोल व्हर्जनसारख्याच दिसणाऱ्या सीएनजी मॉडलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारमध्ये 7.0 इंचांचा हरमन टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे. शिवाय किलेस एंट्री, ड्रायव्हर सीट हाईट अॅडजस्टमेंट, सनरुफ, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो एसी, फॉग लँप आणि 15 इंच व्हील्स अशा सुविधा मिळतातं. कारच्या इंजिनविषयी बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला 1.2 लीटर, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जिथं हे इंजिन 113Nm टॉर्क आणि 86bhp पॉवर जनरेट करतं. CNG वर हेच इंजिन 103Nm टॉर्क आणि 73.4bhp पॉवर जनरेट करतं.
तर टाटा मोटर्सने (Tata Motors) या वर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्सपोमध्ये पंच सीएनजी सादर केली होती. यामध्ये नवीन ट्विन-सिलेंडर टाकी वापरण्यात येणार आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झाल्यास, 1.2-लीटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स गाडीत उपलब्ध असतील. पंचमध्ये (Tata Punch) स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा डिस्प्ले कंपनीने दिलेले आहे. पंच SUV ही जबरदस्त डिझाइन आणि अधिक हेडरूम असलेली एक उत्तम मायक्रो SUV आहे. तर Frons ही चांगल्या परफॉर्मन्ससह एक स्मूथ एसयूव्ही आहे.
इतर महत्वाच्या बातम्या