Best Sales Car In July : SUV कारच्या सर्वाधिक विक्रीत Tata Nexon पहिल्या क्रमांकावर; 'हे' आहे वैशिष्ट्य
Tata Nexon Sales in July : जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये Tata Nexon अव्वल क्रमांकावर आहे.
Tata Nexon Sales in July : जगभरात SUV कारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये भारतामध्येही SUV कारला ग्राहकांची पसंती मिळतेय. या कारच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. अर्थात मागणीत वाढ झाली म्हणजेच विक्रीतही वाढ झालीच. या वर्षी जुलै महिन्यातही या गाड्यांची जबरदस्त विक्री झाली आहे आणि त्यातही टाटा नेक्सॉन (Tata Nexon) एसयूव्ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. जुलैमध्ये टाटाच्या या कारचे एकूण 14,214 युनिट्स विकले गेले आहेत. तर जुलै 2021 मध्ये या कारच्या एकूण 10,287 युनिट्सची विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये टाटा नेक्सॉन कार का खास आहे ते जाणून घ्या.
टाटा नेक्सॉनची वैशिष्ट्ये :
टाटा नेक्सॉनची सुरुवातीची किंमत 7.60 लाख रुपये, एक्स-शोरूम आहे. तर त्याचे टॉप एंड मॉडेल 13.95 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) मध्ये उपलब्ध आहे. ही 5 सीटर एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याचे पेट्रोलवर चालणारे 1.2-लिटर, 3-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले इंजिन 110 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तर 1.5-लिटर 4-सिलेंडर इंजिन डिझेल इंजिन 110 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि (ARAI प्रमाणित) डिझेलमध्ये 21.5 kmpl आणि पेट्रोलमध्ये 17.2 kmpl मायलेज मिळवू शकते.
Hyundai Creta दुसऱ्या क्रमांकावर :
देशातील SUV सेगमेंटमध्ये विक्रीच्या बाबतीत Hyundai Creta दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात जुलैमध्ये क्रेटाच्या (Creta) एकूण 12,625 युनिट्सची विक्री झाली होती. त्याच वेळी, Hyundai Venue 12,000 युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आणि टाटा पंचने 11,007 युनिट्सची विक्री चौथ्या स्थानावर आपली जागा निर्माण केली आहे. मारुती सुझुकी ब्रेझाने 9,694 युनिट्सची विक्री करून टॉप-5 SUV च्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.
महत्वाच्या बातम्या :