ईव्ही मुख्य प्रवाहात आणून FY 23 मध्ये 50,000 वार्षिक विक्रीचं टाटा मोटर्सचं लक्ष्य
Tata Motors : टीपीजी कॅपिटल्सकडून अब्जावधी-डॉलर निधी आणि मॉडेल्सच्या नवीन श्रेणी मुळे टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत सुरुवातीच्या काळात आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे.
Tata Motors : पुढील आर्थिक वर्षात 50,000 र्ईव्ही अर्थात इलेक्ट्रीक व्हेईकल्सचे उत्पादन घेण्याचा मानस ठेवला आहे. टीपीजी कॅपिटल्सकडून अब्जावधी-डॉलर निधी आणि मॉडेल्सच्या नवीन श्रेणी मुळे टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत सुरुवातीच्या काळात आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 50,000 EVs च्या खात्रीशीर उत्पादन योजनेवर विक्रेत्यांना साद घातली आहे आणि पुढील दोन वर्षांत ते वार्षिक 125,000-150,000 युनिट्सपर्यंत वाढवणार आहे, अशी माहिती टाटा मोटर्सच्या सूत्रांकडून मिळाली आहे. जर हे लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी ठरले तर टाटाला ईव्ही व्यवसायातून FY 23 मध्येच 5,000 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, याचेच औचित्य साधन कंपनीने खाजगी इक्विटी फंड (PE) EV व्यवसायातील भागभांडवल विकले.
येत्या १२ ते १८ महिन्यात १० रुपायांच्या खाली तीन परवणाऱ्या इलेक्ट्रिक कार आणि १५००० वाहनांसाठी बुकिंग होईल यासाठी योजना लॉन्च करण्याचा कंपनीचा प्रयत्न असून, Nexon EV च्या निर्मात्याला त्याचा लवकर फायदा होईल असा विश्वास आहे. नवीन नेक्सॉन ईव्ही व्यतिरिक्त चांगला मायलेज असलेल्या टाटा मोटर्सने नवीन टिएगो EV तसेच पंच स्मॉल SUV आणि Altroz हॅचबॅकच्या इलेक्ट्रिक व्हर्जन १० लाखांपेक्षा कमी किमतीत आणण्याचा पावलं उचलण्याचा विचार केला आहे. कंपनीच्या EVs प्रति पूर्ण चार्जमध्ये किमान 200 किमीची धावतील अशी अपेक्षा आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे एमडी शैलेश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी नवीन शहरांमध्ये विस्तार करत असून आणि प्रवेशयोग्यता उत्पादने जोडली जात आहे, परंतु त्यांनी याबाबत अधिक तपशील शेअर केला नाही. "आम्ही दरवर्षी एक किंवा दोन उत्पादने लाँच करणार आहोत, जी वेगवेगळ्या किंमतींची असतील ज्यामुळे सर्वसामान्यांना ती परवडण्या योग्य होतील आणि त्याच्या खरेदीमध्ये वाढ होईल. नेक्सॉन आज आमचा गाभा आहे, येत्या काही वर्षांत तुम्हाला नेक्सॉनच्या खाली तसेच उत्पादनाच्या वरती कृती दिसेल," असंही चंद्रा म्हणाले. .
उत्पादन आणि विक्री योजनेबाबत कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला, परंतु कंपनीच्या एकूण विक्रीपैकी २०% इलेक्ट्रिक वाहनांमधून मिळवण्याचा दीर्घकालीन दृष्टीकोन असल्याचा पुनरुच्चार केला.
टाटा मोटर्सच्या चेअरमनने FY21 मध्ये भागधारकांना संबोधित करताना, FY26 पर्यंत 10 EV लाँच करण्याची योजना जाहीर केली होती.
दरम्यान, प्रवासी वाहन बाजारातील लीडर्स असलेल्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर इंडिया 2024-25 पूर्वी भारतात मुख्य प्रवाहातील ईव्ही लॉन्च करतील अशी अपेक्षा नाही, याचाच अर्थ टाटासाठी कमी स्पर्धा आहे.
आर्थिक वर्ष 2020 मध्ये टाटा मोटर्सच्या एकूण प्रवासी वाहनांच्या व्हॉल्यूममध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 0.2% होता, जो डिसेंबर 2021 मध्ये 5.6% पर्यंत वाढला आहे. FY23 मध्ये 50,000 युनिट्सचं लक्ष्य ठेवल्याने त्याच्या एकूण लक्ष्यित व्हॉल्यूमच्या 12% वर जाऊ शकते.
“Tata Motors EV साठी खूप मोठे बुकिंग प्रलंबित आहे, Nexon आणि Tigor EV या दोन्हीं गाड्यांसाठी 5-6 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पूर्वी आम्हाला 30% खरेदीदार मिळत असत ज्यांच्यासाठी Nexon EV वैयक्तिक वाहन असायचे; आता ते 65% पर्यंत वाढल्याचा दावा कंपनीचा आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मागणी जास्त आहे जिथे सरकारी धोरणांमुळे अतिरिक्त मागणी प्रोत्साहन मिळते. ईव्ही विकण्यासाठी कंपनी आणखी डीलरशिप उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चंद्रा म्हणाले.
खरंतर बॅटरीवर चालणारे वाहन, किंवा BOV, भारतात हळूहळू वाढत आहेत — 2020 मध्ये 119,654 च्या तुलनेत 2021 मध्ये 311,358 BOV ची नोंदणी झाली होती, सरकारच्या वाहन पोर्टलवरच्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
टाटा मोटर्सने FY19 मध्ये 350 EV गाड्या विकल्या, ज्या पुढील आर्थिक वर्षात 1,300 आणि FY21 मध्ये 4,200 पर्यंत याची विक्री वाढली. चालू आर्थिक वर्ष 22 मध्ये त्याचे ईव्ही व्हॉल्यूम 17,000-18,000 युनिट्स असण्याची अपेक्षा आहे. FY22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत टाटा मोटर्सने सुमारे 10,000 ईव्हीची विक्री केली.
EVs मध्ये कंपनीचा बाजार हिस्सा FY19 मध्ये 18% वरून 2021 च्या शेवटी 82% वर गेला आहे.