Tata Motors Price Hiked : Tata Motors ने वाढवली Tiago ची किंमत, जाणून घ्या किंमती किती पटींनी वाढल्या
Tata Tiago Price Hiked : टाटा मोटर्स कंपनीने Tiago च्या CNG व्हेरियंटच्या किंमती वाढवल्या आहेत.
Tata Motors : भारतातील ऑटोमेकर कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक कार टियागोच्या (Tata Tiago) किंमती वाढवल्या आहेत. त्यानंतर आता या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपये झाली आहे. टाटा मोटर्सच्या किंमती वाढल्याने याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. टाटा मोटर्सच्या कोणत्या व्हेरियंटची किंमत किती वाढली या संदर्भात अधिक माहिती वाचा.
किंमतीत झाली वाढ (Tata Motors Price Hiked) :
Tata Tiago च्या XE च्या सुरुवातीच्या व्हेरियंटच्या किमती साडेपाच हजार रुपयांनी वाढल्या आहेत. आता या कारची एक्स-शोरूम किंमत 53,9000 रूपयांवर वर गेली आहे. त्याच वेळी, त्याच्या XT व्हेरिएंटची नवीन किंमत आता 20 हजार रुपयांनी वाढून 61,9900 रुपये इतकी झाली आहे. त्याच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किंमतीही त्याच प्रमाणात वाढल्या आहेत.
या व्हेरिएंटची किंमत वाढलेली नाही
टाटा मोटर्सने टाटा टियागोच्या किंमतीत जरी वाढ केली असली तरी मात्र, कंपनीने Tiago च्या XT RHYTHM व्हेरिएंटच्या किंमतीत काहीच बदल केलेला नाही. त्याचे XZ Plus, XZA Plus, XZ Plus DT आणि XZA Plus DT रूपये विकले जातील. XZ आणि XZA व्हेरियंट आता Tata Motors ने यादीतून काढून टाकले आहेत. त्यामुळे किंमतीत कोणता बदल करण्यात आला नाही.
किंमती खूप जास्त आहेत (Price Hike) :
Tata Tiago च्या XT (O) व्हेरियंटसाठी 5,000 रूपयांपासून वाढून NRG XT साठी 8,000 रूपये झाली आहे. NRG साठी 7,000, XZ+ व्हेरियंटसाठी 7,000, XZ+ (DT) साठी 8,000, NRG AMT ची किंमत 0,700 प्लस, XZ+ ने वाढवण्यात आली आहे. 7,000 रूपयांनी आणि XZA+ DT तब्बल 8,000 रूपयांनी वाढविण्यात आली आहे.
सीएनजी व्हेरिएंटमध्ये वाढ झाली आहे (CNG varient Price Hike) :
कंपनीने Tata Tiago च्या CNG व्हेरियंटच्या किंमतीही वाढवल्या आहेत. त्याच्या CNG XE आणि CNG XM च्या किमती 5,000 रूपयांनी, CNG XT ₹ 20,000 ने, XZ 7,000 रूपयांनी आणि XZ+ DT CNG च्या किमती 8,000 रूपयांनी वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Car Comparison: Tata Tiago CNG की Grand Nios i10 CNG? कोणती आहे बेस्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती