Car Comparison: Tata Tiago CNG की Grand Nios i10 CNG? कोणती आहे बेस्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tata Tiago vs Hyundai Grand Nios: देशात पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता अनेक ग्राहक हे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार खरेदीवर भर देत आहेत. अनेक वाहन उत्पादक कंपनी आपल्या कारचे सीएनजी मॉडेल बाजारात लॉन्च करत आहेत.
Tata Tiago vs Hyundai Grand Nios: देशात पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता अनेक ग्राहक हे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार खरेदीवर भर देत आहेत. अनेक वाहन उत्पादक कंपनी आपल्या कारचे सीएनजी मॉडेल बाजारात लॉन्च करत आहेत. अशातच प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सनेही आपली नवीन Tata Tiago CNG प्रकारात लॉन्च केली आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत आधीपासूनच उपलब्ध असलेल्या Hyundai Grand Nios i10 कारशी स्पर्धा करेल. ग्रँड निओस सीएनजी प्रकारातही उपलब्ध आहे. दोन कारपैकी कोणती चांगली आहे हे आपण या दोन्ही कारची तुलना करून जाणून घेणार आहोत.
डिझाइन
Tata Tiago NRG iCNG कारला क्रोम ग्रिल, स्कल्पटेड हूड, स्वेप्ट-बॅक हेडलाइट्स, रुंद एअर व्हेंट्स आणि सिल्व्हर स्किड प्लेट सारखी फीचर्स मिळतात. तर Hyundai Grand i10 ला इंटिग्रेटेड डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs), ग्लॉस ब्लॅक ग्रिल आहेत. रेल, शार्क-फिन अँटेना, रॅप-अराउंड टेललाइट्स, स्कल्पेटेड हुड आणि 15-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स. या व्यतिरिक्त दोन्ही कारमध्ये समान रूफ रेल, ब्लॅक बी-पिलर, इंडिकेटर-माउंटेड ORVM, फ्लेर्ड व्हील आर्च आणि 15-इंच अलॉय व्हील आहेत.
इंजिन
Tata Tiago NRG iCNG कारमध्ये1.2-L पेट्रोल इंजिन मिळते. जे CNG किटसह 72hp ची कमाल पॉवर आणि 95Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर Hyundai Grand i10 Nios CNG कारमध्ये ग्राहकांना 1.2-L इनलाइन-फोर इंजिन मिळते. जे 68hp ची कमाल पॉवर आणि 95.2Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच ट्रान्समिशनसाठी दोन्ही कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडले गेले आहेत.
मायलेज
दोन्ही सीएनजी कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा टियागो 26.49 kmpl आणि Grand Nios ARAI नुसार 18.9 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
फीचर्स
प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून कंपन्यांनी दोन्ही सीएनजी कारमध्ये ड्युअल एअरबॅग आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) दिली आहे. याशिवाय Tiago NRG iCNG कारला ऑल-ब्लॅक डॅशबोर्ड, प्रीमियम फॅब्रिक अपहोल्स्ट्री, मॅन्युअल एसी, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, हरमन साउंड सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह 7.0-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. Grand i10 Nios कारमध्ये सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 8.0-इंच इन्फोटेनमेंट सिस्टमसह किमान ड्युअल-टोन डॅशबोर्ड मिळतो.
किंमत
Tata Tiago iCNG भारतात 7.4 लाख ते 7.8 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. Hyundai i10 Nios CNG 7.16 लाख ते 8.45 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. दरम्यान, Hyundai Grand i10 ही लूक आणि काही अतिरिक्त फीचर्सच्या बाबतीत चांगली आहे. तर Tata Tiago CNG मध्ये तुम्हाला उत्तम बिल्ड क्वालिटी, आकर्षक लूक आणि अधिक पॉवरफुल इंजिन मिळते.