एक्स्प्लोर

Tata Punch CAMO : टाटा पंचची स्पेशल कॅमो एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Tata Punch CAMO :  टाटा पंचने गेल्या 10 महिन्यांमध्ये एक लाख तर 34 महिन्यांमध्ये 4 लाखांच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. 

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने भारतातील पहिल्‍या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा पंचची स्‍पेशल, लिमिटेड पीरियड कॅमो (CAMO) एडिशन लाँच केली. आता ही एडिशन आकर्षक नवीन सीवीड ग्रीन रंगासह पूरक सफेद रंगाचे रूफ, आर16 चारकोल ग्रे अलॉई व्‍हील्‍स आणि अद्वितीय सीएएमओ थीम पॅटर्न असलेले प्रीमियम अपहोल्‍स्‍टरीसह उपलब्‍ध आहे. 

टाटा पंच कॅमोची वैशिष्ट्ये

या एडिशनमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे 10.25-इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍ले. या एडिशनमध्‍ये कम्‍फर्ट-टेक वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे वायरलेस चार्जर, रिअर एसी वेंट्स व फास्‍ट सी-टाइप यूएसबी चार्जर आणि ग्रॅण्‍ड कन्‍सोलसह आर्मरेस्‍ट, जे टाटा पंचची साहसी क्षमता, प्रीमियम दर्जा आणि ड्रायव्हिंग अनुभवामध्‍ये अधिक भर करतात. 8,44,900  रूपयांच्‍या (एक्‍स-शोरूम नवी दिल्‍ली) आकर्षक सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असलेली पंच कॅमो आता टाटा मोटर्स वेबसाइटवर बुक करता येऊ शकते.  

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, "ऑक्‍टोबर 2021 मध्‍ये लाँच झाल्‍यापासून पंचला आकर्षक डिझाइन, वैविध्‍यपूर्ण व सर्वसमावेशक कार्यक्षमता, एैसपैस जागा असलेले इंटीरिअर्स आणि अधिक सुरक्षिततेसाठी उत्तम कौतुकास्‍पद प्रतिसाद मिळाला आहे. या वेईकलने प्रमुख एसयूव्‍ही पैलूंचे यशस्‍वीरित्‍या लोकशाहीकरण करत नवीन श्रेणी स्‍थापित केली, तसेच कॉम्‍पॅक्‍ट फूटप्रिंटमध्‍ये सर्वसमावेशक पॅकेज देत आहे.

संपन्‍न मूल्‍य तत्त्व, स्‍टाइल व कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आणि सतत वाढत असलेल्‍या लोकप्रियतेने टाटा पंचला आर्थिक वर्ष 25 मध्‍ये सर्व श्रेणींमधील सर्वाधिक विक्री होणारी वेईकल बनवले आहे. ही लोकप्रियता पाहता, आम्‍ही पंचचे आणखी एक लिमिटेड कॅमो एडिशन लाँच करत आहोत. सुरू असलेल्‍या सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत ही एडिशन ग्राहकांना त्‍यांच्‍या आवडत्‍या एसयूव्‍हीचे मालक बनण्‍याचे आणखी एक कारण देईल." 

सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हींमध्‍ये अग्रस्‍थानी

टाटा पंच भारतातील सर्वात सुरक्षित सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हींमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. या वेईकलला 2021 जीएनसीएपी सुरक्षितता नियमांतर्गत प्रतिष्ठित 5-स्‍टार रेटिंग मिळाले आहे. प्रबळ डिझाइन, 187 मिमी ग्राऊंड क्‍लीअरन्‍स, कमांडिंग ड्रायव्हिंग पोझीशन आणि भारतातील विविध प्रदेशांमधून सहजपणे प्रवास करण्‍याची क्षमता यासह पंच रोमांचक ड्रायव्हिंग अनुभव देते. 

या कारने फक्‍त 10 महिन्यांमध्‍ये 1 लाख विक्रीचा टप्‍पा गाठत आणि फक्‍त 34 महिन्‍यांमध्‍ये 4 लाख विक्रीचा टप्‍पा पार करत उद्योग बेंचमार्क्‍स स्‍थापित केले आहेत. पेट्रोल, ड्युअल-सिलिंडर सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन्‍समध्‍ये व विविध परसोनामध्‍ये उपलब्‍ध असलेली पंच प्रत्‍येक ग्राहकाच्‍या पसंतीची पूर्तता करते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget