एक्स्प्लोर

Tata Ace EV: लहान ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी आहे बेस्ट, Tata Ace EV ची डिलिव्हरी सुरू; एका चार्जमध्ये देते 154 किलोमीटरची रेंज

Tata Ace EV: देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) सोमवारी नवीन Ace EV Ace EV ची (electric vehicle) डिलिव्हरी सुरू केली आहे.

Tata Ace EV: देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) सोमवारी नवीन Ace EV Ace EV ची (electric vehicle) डिलिव्हरी सुरू केली आहे. यासह कंपनीने शहरांतर्गत माल वाहतुकीसाठी शाश्वत वाहतूक उपाय प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. Ace EV हे भारतातील सर्वात अ‍ॅडव्हान्स, zero-emission, छोटे चारचाकी व्यावसायिक वाहन आहे. Ace EVs चा पहिला ताफा ई-कॉमर्स, एफएमसीजी व कुरियर कंपन्‍यांना आणि त्‍यांचे लॉजिस्टिक्‍स सेवा प्रदाते:  Amazon, DHL (एक्सप्रेस आणि सप्लाय चेन), FedEx, Flipkart, Johnson & Johnson Consumer Health, Moving, Safeexpress आणि ट्रेंट लिमिटेड यांना डिलिव्‍हर करण्‍यात आला आहे. 

मे 2022 मध्‍ये हे वाहन सादर करण्यात आले होते. नवीन Ace EV त्याच्या वापरकर्त्यांच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे. या वाहनाने अनेक टेस्ट यशस्वीपणे पार केल्या आहेत. Ace EV ही कार्गो मोबिलिटीसाठी सर्वांगीण सोल्‍यूशन आणि 5 वर्षांचे सर्वसमावेशक मेन्‍टेनन्‍स पॅकेजसह येते. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, 100 टक्के अपटाइमसह याच्या दमदार कामगिरीला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. Ace EV च्या सपोर्टिंग इकोसिस्टममध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, जास्तीत जास्त फ्लीट अपटाइमसाठी समर्पित इलेक्ट्रिक व्हेईकल सपोर्ट सेंटर्सची स्थापन करणे, टाटा फ्लीट एज स्थापन करणे, संबंधित टाटा ग्रुप कंपन्‍यांची प्रमाणित सक्षम इको-सिस्‍टम टाटा युनिईव्‍हीर्सचा पाठिंबा आणि निधीसाह्यसाठी देशातील आघाडीच्‍या फायनान्शियर्ससोबत सहयोगांचा समावेश आहे.

पॉवर आणि रेंज 

Tata Ace EV हे टाटा मोटरचे EVOGEN पॉवरट्रेन मिळवणारे पहिले उत्पादन आहे. जे 154 किमीची प्रमाणित रेंज देते. नवीन मॉडेल अ‍ॅडव्हान्स बॅटरी कूलिंग सिस्टम आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह सुरक्षित आणि प्रत्येक वातावरणात हे वाहन चालणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हाय अपटाइमसाठी वाहन रेगुलर आणि फास्ट चार्जिंग दोन्ही सपोर्ट सिस्टिमसह येते. यात 27kW (36bhp) मोटर मिळते. जी 130Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. Tata Ace EV मध्ये 208 क्यूबिक फूट किंवा 3332.16 kg/क्यूबिक मीटर कार्गो व्हॉल्यूम आणि 22 टक्के ग्रेड-क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 

Cheapest Mahindra Thar : सर्वात स्वस्त Mahindra Thar भारतात लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत आणि फीचर्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget