लॉन्च होण्यापूर्वी Simple One ची 1 लाख प्री-बुकिंग, Ola-Ather चं वाढलं टेन्शन
Simple ONE Electric Scooter: स्टार्टअप इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता Simple Energy ला त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर Simple One साठी 1 लाख युनिट्सचे बुकिंग मिळाली आहे.
![लॉन्च होण्यापूर्वी Simple One ची 1 लाख प्री-बुकिंग, Ola-Ather चं वाढलं टेन्शन Simple One Electric Scooter Crosses 1 Lakh Bookings Production to be Ramped Up लॉन्च होण्यापूर्वी Simple One ची 1 लाख प्री-बुकिंग, Ola-Ather चं वाढलं टेन्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/0b85be79094078e2ffc08f1a3a95d83b1675859757257384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Simple ONE Electric Scooter: भारताच्या वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत स्टार्टअप्स कंपन्याही आपलं स्थान बळकट करताना दिसत आहेत. स्टार्टअप इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता Simple Energy ला त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर Simple One साठी 1 लाख युनिट्सचे बुकिंग मिळाली आहे. यासह कंपनीने लेटेस्ट फंडिंग राउंडमध्ये 20 मिलियन डॉलर्स (165 कोटी) फंडिंग देखील मिळवली आहे. कंपनीची ही नवीन स्कूटर काही असणार, यात कोणते नवीन फीचर्स मिळणार, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
सिंपल एनर्जीने अलीकडेच सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन तामिळनाडू येथील उत्पादन प्रकल्पात सुरू केले आहे. शुलागिरी, तामिळनाडू येथे हा प्लांट 2 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला आहे. या प्लांटला सिंपल व्हिजन 1.0 असे नाव देण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा उत्पादन कारखाना विविध प्रकारच्या आधुनिक सुविधा आणि उत्पादन उपकरणांनी सुसज्ज आहे.
कंपनीच्या प्लांटमध्ये स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग लाइन तसेच बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग लाइन आहे, जिथे सेल असेंबल केले जातात आणि बॅटरी पॅक तयार केले जातात. स्कूटर बनवण्यासाठी कंपनी अधिकाधिक स्थानिक उपकरणे वापरत आहे. सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा प्लांट 700 स्थानिक तरुणांना रोजगारही देत आहे.
200 किमीची देणार रेंज
Simple Energy च्या इलेक्ट्रिक स्कूटर Simple One बद्दल सांगायचे तर, ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 200 किमीची रेंज देते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कंपनीने यामध्ये 4.8 kWh लिथियम आयन बॅटरी पॅक वापरला आहे. स्कूटरमधील पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर 8.5kW पॉवर आणि 72Nm पीक टॉर्क जनरेट करते.
परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 2.77 सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग पकडू शकते. आणि त्याचा टॉप स्पीड 105 किमी/तास आहे. सिंपल वनचे प्री-बुकिंग आधीच सुरू आहे आणि कंपनीच्या वेबसाइटवर 1,947 रुपये रिफंड रक्कम भरून बुक केले जाऊ शकते. सिंपल वन भारतात 1.05 लाख रुपयाच्या (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
मॅटर ड्राइव्ह 1.0 बाईक लवकरच होणार लॉन्च
ई-वाहन स्टार्टअप मॅटर ईव्ही (Matter EV) भारतात आपली पहिली ई-बाईक लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मॅटर ड्राइव्ह 1.0 ई-बाईकचा खुलासा केला होता. या बाईकचे तंत्रज्ञान आणि फीचर्स पाहता सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या कोणत्याही ई-बाईकपेक्षा ती अधिक आधुनिक असेल. कंपनी या बाईकमध्ये लिक्विड कूल्ड मोटर आणि बॅटरी वापरत आहे. यासोबतच या ई-बाईकमध्ये पेट्रोल बाईकसारखे गिअरही दिले जात आहेत. मॅटर ई-बाईकची रेंज मॉडेलवर अवलंबून 125-130 किमी असण्याचा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)