Ola Electric Scooter: ओला करणार आणखी एक धमाका! 'या' दिवशी लॉन्च होऊ शकते नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
Ola Upcoming Electric Scooter: ओला इलेक्ट्रिक आपल्या S1 स्कूटर रेंजच्या यशानंतर इलेक्ट्रिक टू-व्हीलरची सर्वात मोठी उत्पादक बनली. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनी काही नवीन उत्पादनांची घोषणा करणार आहे.

Ola Upcoming Electric Scooter: ओला इलेक्ट्रिक आपल्या S1 स्कूटर रेंजच्या यशानंतर इलेक्ट्रिक टू-व्हीलरची सर्वात मोठी उत्पादक बनली आहे. कंपनी दर महिन्याला 20,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. Ola ची नवीन ई-स्कूटर Ola S1 Air आहे आणि याची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनी काही नवीन उत्पादनांची घोषणा करणार आहे.
Ola Upcoming Electric Scooter: 9 फेब्रुवारीला लाॅन्च होऊ शकते नवीन स्कूटर
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये या स्कूटरशी संबंधित काही नवीन अपडेट्स जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. 9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता याचा खुलासा केला जाईल, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
Ola Upcoming Electric Scooter: नवीन स्कूटर S1 Air पेक्षाही स्वस्त असू शकते
एका रिपोर्टनुसार, कंपनी S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरच्या नवीन प्रकाराचे अनावरण करू शकते. काही रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, नवीन स्कूटर S1 Air पेक्षाही स्वस्त असू शकते, जी बाजारात 100-110 cc पेट्रोल स्कूटरशी स्पर्धा करेल.
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल भारतात इलेक्ट्रिक वाहने, विशेषत: इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्वस्त बनविण्यावर भर देत आहेत. भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेसाठी परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याबद्दल त्यांनी अनेकवेळा वक्तव्य केलो आहेत. आत्तापर्यंत 9 फेब्रुवारीच्या लॉन्चशी संबंधित माहिती मर्यादित आहे आणि नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याबद्दल अद्याप स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही.
Ola S1 Air कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
दरम्यान, Ola S1 Air ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी 84,999 रुपयेच्या (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे. या किमतीत स्कूटर Activa 6G H-Smart पेक्षा 4,000 रुपये महाग आणि TVS iQube पेक्षा 14,000 रुपये स्वस्त आहे. ही स्कूटर अनेक प्रीमियम फीचर्ससह येते. ज्याला बाजारात मोठी मागणी आहे. कंपनी Ola S1 Air मध्ये 2.5 kWh ची लिथियम आयन बॅटरी वापरत आहे. फुल चार्ज झाल्यावर याची रेंज 101 किलोमीटर आहे आणि याची टॉप स्पीड 90 किमी/तास आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4.30 तास लागतात. S1 Air ला पुढील बाजूस ड्युअल टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. सुरक्षिततेसाठी स्कूटरला फ्रंट डिस्क ब्रेक आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
