Electric Scooter Comparison: Ola S1 Air vs TVS iQube, कोणती आहे बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर?
Ola S1 Air vs TVS iQube: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ओलाने मोठी आघाडी घेतली आहे. ओलच्या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे.
Ola S1 Air vs TVS iQube: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ओलाने मोठी आघाडी घेतली आहे. ओलच्या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. अशातच कंपनीने नुकतीच आपली S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरचा लूक Ola च्या S1 आणि S1 Pro सारखा आहे. या स्कूटरला नवा लूक देण्यासाठी लोअर बॉडीवर ड्युअल टोन फिनिश आणि ब्लॅक क्लॅडिंग देण्यात आले आहे. ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत TVS iQube शी स्पर्धा करेल. चला या दोन्ही स्कूटरची संपूर्ण तुलना पाहू.
Ola S1 Air vs TVS iQube: लूक
Ola S1 Air मध्ये 7.0-इंचाचा TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी टेललॅम्प, रबर मॅट्ससह फ्लॅट फूटबोर्ड, स्मायली-आकाराचे ड्युअल-पॉड एलईडी हेडलाइट, 12-इंच स्टील व्हील, एक फ्लॅट-टाइप सीट आणि खालील भागात ब्लॅक क्लॅडिंग देण्यात आले आहे. TVS iQube मध्ये 5.0-इंचाचे TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऍप्रॉन-माउंट केलेले LED हेडलॅम्प, SmartX कनेक्ट सिस्टम, 12-इंच अलॉय व्हील, फ्लॅट सीट, LED टेललाइट आहे.
Ola S1 Air vs TVS iQube: रेंज
Ola S1 Air मध्ये 4.5kW हब-माउंट इलेक्ट्रिक मोटरसह 2.5kWh क्षमतेची बॅटरी मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 4.3 सेकंदात 0 ते 40 kmph चा वेग पकडू शकते. TVS iQube 4.4kW हब-माउंट इलेक्ट्रिक मोटरसह 3.04kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर 100 किमी पर्यंतची रेंज देतात.
Ola S1 Air vs TVS iQube: फीचर्स
TVS iQube आणि Ola S1 Air ला सेफ राइडिंगसाठी दोन्ही चाकांवर रायडरच्या डिस्क ब्रेकसह कंबाईन ब्रेकिंग सिस्टम (CBS) मिळतात. यासोबतच क्रूझ कंट्रोल आणि उत्तम राइडिंगसाठी तीन मोड देण्यात आले आहेत. दोन्ही स्कूटरमध्ये मागील बाजूस मोनो-शॉक युनिट वापरण्यात आले आहे. या दोघांची परफॉर्मन्स जवळपास सारखीच आहे.
किंमत
ओला इलेक्ट्रिकने आपल्या S1 एअरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 79,999 रुपये ठेवली आहे. तर TVS iQube ची एक्स-शोरूम किंमत 99,130 रुपये ठेवण्यात आली आहे. TVS iQube ही एक अतिशय चांगली आणि आलिशान इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि ही स्कूटर देशात खूप पसंत केली जात आहे. मात्र यात काही अत्याधुनिक फीचर्सचा अभाव आहे. तर कमी किंमतीत अधिक फीचर्ससह आणि थोड्या कमी किमतीमुळे S1 Air हा एक चांगला पर्याय आहे.