नागपुरातून दुपारी साडेबाराला निघाले अन् सायंकाळी सव्वा पाचला शिर्डीत पोहोचले; जेवण केलं, सत्कार स्विकारत पावणेपाच तासात 529 किमी अंतर पार
Maharashtra Samruddhi Mahamarg: नागपूर ते शिर्डी हे जवळपास 529 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले.
Maharashtra Samruddhi Mahamarg: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. नागपूर ते शिर्दी टप्प्याचा त्यांना आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर गाडी चालवली, जवळपास 150 किमी वेगाने फडणवीस यांनी महामार्गावर गाडी चालवली. नागपूर ते शिर्डी हे जवळपास 529 किमीचं अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केले. नागपूरहून शिर्डीच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचा ताफा साडेबारा वाजताच्या आसपास निघाला होता. सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजताच्या आसपास उपमुख्यमंत्री-मुख्यमंत्र्यांचा ताफा शिर्डीमध्ये पोहचला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर 'टेस्ट राईड' घेतली. नागपूरहून शिर्डीला टेस्ट ड्राईव्ह करताना त्यांचा ताफा वाशिममध्ये वारंगी कँपला जेवणासाठी थांबला होता. त्याशिवाय काही ठिकाणी सत्कारासाठीही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थांबले होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी @PMOIndia @narendramodi जी यांच्या शुभहस्ते होणार आहे.तत्पूर्वी मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी मिळून #नागपूर ते #शिर्डी दरम्यान महामार्गाच्या कामाचा आज आढावा घेतला. pic.twitter.com/2JEqhwv2u0
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 4, 2022
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा कसा झाला प्रवास?
१२.३५ वा. समृद्धी मार्गाच्या स्टाटिंग पॉईंटला म्हणजे झिरो माईल्स ला पोहोचले
१२.३५ वाजता समृद्धीचा पाहणी दौरा सुरु
१२.४० वायफळ टोल बुथला दाखल
१२.४० ते १.२५ धामणगाव (अमरावती) ला दाखल
१.१४ मिनिट अमरातीत प्रवेश - १.३५ वाशिममध्ये प्रवेश (55-60 किमी अंतर २० मिनिटांत)
२.२० वाजता वारंगी कँपला (वाशिम) मिनिटांनी पोहोचले, आराम आणि जेवण
२.५५ जेवण आणि आराम करुन रवाना, केनवड हा वाशिमचा एक्झिट पॉईंट आहे (वारंगी कँप ते केनवड २० किमी. १० मिनिटांत)
३.१२ मिनिटांनी बुलढाण्यात दाखल
३.१५ मिनिटांनी मेहकरला स्वागत समारंभ झाला
३.२१ वाजता मेहकरवरुन ताफा रवाना
दुपारी 4 वाजता जालन्यातील जामवाडी पोहचले.
दुपारी 4.10 वाजता जालन्याकडून हसूल सांगवी औरंगाबादकडे रवाना
दुपारी 4.25 वाजता औरंगाबाद मध्ये पोहचले.
दुपारी 4.30 वाजता हसूल सांगवी औरंगाबागहून शिर्डीकडे निघाले
संध्याकाळी ५.१५ वाजता- शिर्डीत पोहचले