Car : Wagon R ठरली देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार; वाचा कारचे दमदार फिचर्स आणि वैशिष्ट्य
Top Selling Cars in India 2022 : गेल्या महिन्यात, मारुती सुझुकीने एंट्री-लेव्हल कारमध्ये सर्वाधिक वॅगन आर (Wagon R) कार विकल्या गेल्या.

Top Selling Cars in India 2022 : भारतीय बाजारपेठेत जून महिन्यात अनेक कार लॉन्च झाल्या. यामध्ये एन्ट्रीलेव्हल कारच्या विक्रीवर आधीच्या तुलनेपेक्षा घट झाली आहे. मात्र, तरीसुद्धा या सेगमेंटमधील कारला बाजारात विशेष मागणी आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कार विकल्या जातात. विशेषत: या कारची किंमत कमी असल्यामुळे प्रथमच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची या कारना प्राधान्य देतात. गेल्या महिन्यात या सेगमेंटमध्ये कोणत्या कारची सर्वाधिक विक्री झाली ते जाणून घेऊयात.
गेल्या महिन्यात, मारुती सुझुकीने एंट्री-लेव्हल कारमध्ये सर्वाधिक वॅगन आर (Wagon R) कार विकल्या गेल्या. 19,190 युनिट्सच्या विक्रीसह, वॅगन आर या वर्षीच्या जूनमध्ये (June 2022) केवळ त्याच्या विभागातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वाधिक विक्री होणारी कार होती. तर मारुतीची अल्टो (Maruti Alto) 13,790 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विक्रीच्या बाबतीत मारुतीची सेलेरियो आणि टाटाची टियागो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. रेनॉल्टची क्विड 2,560 युनिट्ससह सहाव्या स्थानावर आहे. मारुतीच्या S-Presso ला 652 युनिट्सच्या विक्रीसह सातवे स्थान मिळाले. गेल्या महिन्यात ह्युंदाईच्या सँट्रोचे फक्त 7 युनिट्स विकले जाऊ शकले.
Wagon R ही सर्वाधिक विक्री होणारी कार
मारुती वॅगन आर ही सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुती सुझुकीच्या वॅगन आरमध्ये दोन प्रकारचे पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पहिले 1.0 लिटर K10 इंजिन आणि दुसरे 1.2 लिटर K12 इंजिन. हे दोन्ही इंजिन पर्याय मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. या कारमध्ये अनेक उत्तम आणि उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीच्या विक्रीच्या आकड्यात या कारचा चांगला वाटा आहे. मारुतीची वॅगन आर सहसा सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत अव्वल स्थानावर असते. मारुती अल्टो देखील या यादीत वॅगन आरच्या जवळ आहे.
महत्वाच्या बातम्या :























