7-सीटर कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, मारुती सुझुकी घेऊन येत आहे या दोन मस्त कार! ADAS फीचरने असेल सुसज्ज
Maruti Suzuki Upcoming 7 Seater Suv: जर तुम्ही 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मारुती सुझुकी लवकरच दोन नवीन 7-सीटर कार लॉन्च करणार आहे.
Maruti Suzuki Upcoming 7 Seater Suv: जर तुम्ही 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मारुती सुझुकी लवकरच दोन नवीन 7-सीटर कार लॉन्च करणार आहे. मारुतीने या दोन्ही गाड्यांवर काम सुरू केले आहे. यात ग्रँड विटारा-आधारित मॉडेल आहे, जे एकदा भारतीय बाजारात लॉन्च झाल्यानंतर महिंद्रा XUV700 सारख्या कारला टक्कर देईल. मारुती सुझुकी या दोन्ही कार खरेदीदारांसाठी लॉन्च करेल जे व्यावहारिक आणि कौटुंबिक मूव्हर पर्याय शोधत आहेत.
Maruti Suzuki Upcoming 7 Seater Suv: ही 7 सीटर कार अत्याधुनिक फीचर्सने असेल सुसज्ज
मारुती नवीन ग्रँड विटारा-आधारित 7-सीटर SUV लॉन्च करेल. ही कार एकसमान प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून यात समान इंजिन पर्याय मिळू शकतो. कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स असू शकतात. यात एक मोठा सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश-बटण स्टार्ट आणि इतर अनेक फीचर्स मिळतील.
Maruti Suzuki Upcoming 7 Seater Suv: ही एसयूव्ही ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल
नवीन SUV ग्लोबल C प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यात स्ट्रॉंग सस्पेंशन सेटअप आणि सोर्टेड डायनॅमिक्स असेल. एकदा ही कार देशात लॉन्च झाल्यानंतर याची स्पर्धा Mahindra XUV700 आणि Hyundai Alcazar सारख्या कारशी होईल. हरियाणातील मारुतीच्या नवीन खरखोडा प्लांटमध्ये ही कार तयार केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.
Maruti Suzuki Upcoming 7 Seater Suv: मारुतीची दुसरी 7-सीटर MPV
दुसरी 7-सीटर MPV भारतीय बाजारपेठेत अलीकडेच लॉन्च झालेल्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे रिबॅज केलेले प्रकार असेल. ही नवीन MPV मारुतीने देशात लॉन्च केलेली पहिली री-बॅज असलेली टोयोटा कार असेल. ही दोन पॉवरट्रेन पर्याय 2.0L 4-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल स्ट्रॉंग हायब्रिड पेट्रोल आणि 2.0L NA पेट्रोल इंजिनसह येऊ शकते.
Maruti Suzuki Upcoming 7 Seater Suv: ADAS फीचर असलेली पहिली मारुती कार
हे दोन्ही इंजिने पुढच्या चाकांना उर्जा पाठवतात आणि स्वयंचलित गिअरबॉक्स सेटअपसह ऑफर केली जातात. नवीन MPV ला इनोव्हा हायक्रॉस पेक्षा वेगळे करण्यासाठी किरकोळ स्टाइलिंग अपडेट्स मिळतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या नवीन MPV मध्ये वायरलेस चार्जिंग, पॉवर ऑपरेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक आणि बरेच काही असेल. याशिवाय यात ADAS सुरक्षा तंत्रज्ञान आणि अॅडव्हान्स सुरक्षा फीचर्ससह लॉन्च होणारी देशातील पहिली मारुती कार देखील असेल.