Upcoming Cars : मारुतीची 'ही' जबरदस्त SUV लवकरच होणार लॉन्च; दमदार इंजिनसह मिळतील भन्नाट फिचर्स
Upcoming Maruti Cars : मारूती कार कंपनी सध्या नवीन कारवर काम करत आहे. ही आगामी कार मारुती बलेनोवर (Maruti Baleno) आधारित आहे.
Upcoming Maruti Cars : स्वदेशी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) सध्या आपला पोर्टफोलिओ वाढविण्यात व्यस्त आहे. मारूती कार कंपनी सध्या नवीन कारवर काम करत आहे. ही आगामी कार मारुती बलेनोवर (Maruti Baleno) आधारित आहे. कंपनीने त्याला YTB असे सांकेतिक नाव दिले आहे. मारुती या आगामी कारला चांगला प्रतिसाद देईल अशी आशा आहे. भारतीय कार बाजारात ही कार सध्याच्या बलेनो हॅचबॅकपेक्षा वरचे स्थान घेईल असे सांगितले जात आहे.
टेस्टिंग दरम्यान स्पॉट
ही आगामी कार चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. त्याच वेळी, त्याचा जागतिक प्रीमियर 2023 ऑटो एक्सपोमध्ये होऊ शकतो. 2023 ऑटो एक्सपो जानेवारीमध्ये होणार आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये 1.0 लिटर 3-सिलेंडर बूस्टरजेट टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच पॉवरट्रेनचा वापर कंपनीने यापूर्वी Baleno RS मध्ये केला होता आणि ते जास्तीत जास्त 100 PS पॉवर आउटपुट आणि 150 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. त्याचबरोबर या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देणे अपेक्षित आहे.
Baleno S-Cross ची समानता
ही आगामी कार बलेनो क्रॉस (Baleno S-Cross) सारखीच आहे. या कारमध्ये बलेनो क्रॉसचे बॉडी पॅनल आणि इंटीरियरचे अनेक घटक पाहायला मिळतील. नुकतीच समोर आलेली स्पाय इमेज सूचित करते की डॅशबोर्ड आणि सेंट्रल कन्सोल देखील बलेनोमध्ये बसवले जातील. यात प्रीमियम हॅचबॅक जसे फ्लोटिंग 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, 360-डिग्री कॅमेरा सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.
मारुती अल्टो K10 वर डिस्काऊंट (Maruti Alto K10) :
कंपनी नुकत्याच लाँच झालेल्या Alto K10 वर सूट देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या वर्षात लाँच झालेली ही पहिली कार आहे ज्यावर सणासुदीत सूट दिली जात आहे. मारुती नवीन पिढीच्या अल्टोवर 39,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या कारच्या खरेदीवर 20,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे.
महत्वाच्या बातम्या :
Maruti Brezza Booking: 'ब्रेझा'ला तुफान मागणी, डिलिव्हरीसाठी पाहावी लागेल तब्बल 30 आठवडे वाट