(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maruti Suzuki Fronx लवकरच भारतात होणार लॉन्च; 'या' कारला देणार जबरदस्त टक्कर
Maruti Suzuki Fronx : मारुती फ्रॉन्क्स कॉम्पॅक्ट क्रॉसओवरमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले यांसारखी अनेक वैशिष्ट्य देण्यात आली आहेत.
Maruti Suzuki Fronx : दिग्गज कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) एप्रिल-मे मध्ये देशात आपली कॉम्पॅक्ट क्रॉसओवर फ्रॉन्क्स (Maruti Suzuki Crossover Fronx) लॉन्च करणार आहे. या कारच्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटची किंमत सुमारे 8 लाख रुपये असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. कार लॉन्चिंगच्या वेळी कारची किंमत सारखीच असेल तर ही कार देशातील टाटा पंच, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट किगर, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सॉनेट सारख्या कारशी स्पर्धा करेल.
Maruti Suzuki Fronx चे इंजिन कसे असेल?
नवीन मारुती फ्रँक्स एसयूव्हीमध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल बूस्टरजेट किंवा 1.2-लिटर, 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिसू शकते. लाईट हायब्रीड टेक्नॉलॉजीसह याला बूस्ट पॉवर मिळेल. हे साधारणपणे 147.6Nm/100bhp आणि 113Nm/90bhp चे आउटपुट जनरेट करतात. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्याय मिळू शकतो. तर टर्बो-पेट्रोल इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळू शकते.
1.2L नैसर्गिकरित्या एस्पिरेट केलेले पेट्रोल इंजिन सिग्मा, डेल्टा आणि डेल्टा+ ट्रिम्समधील मानक मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल. एएमटी ट्रान्समिशन फक्त डेल्टा आणि डेल्टा+ ट्रिममध्ये उपलब्ध असेल. टर्बो-पेट्रोल इंजिन डेल्टा+, झेटा आणि अल्फा ट्रिम्समधील मानक मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडले जाईल. तर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स Zeta आणि Alpha trims सह उपलब्ध असतील.
वैशिष्ट्ये कशी असतील?
मारुती फ्रॉन्क्स कॉम्पॅक्ट क्रॉसओवरमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले (HUD), क्रूझ कंट्रोल, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, 16-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील, ड्युअल-टोन एक्सटीरियर कलर्स, वायरलेस चार्जर, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह इन्फोटेनमेंट सिस्टिमची वैशिष्ट्ये आहेत. 6-स्पीकर साउंड सिस्टीम, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये कलरफुल MID, हाईट एज्टेबल ड्रायव्हर सीट, मागील AC व्हेंट्स, वेगवान USB चार्जिंग पॉइंट, कनेक्टेड कार फिचर्स, रियर व्हूय कॅमेरा आणि 7.0-इंच टचस्क्रीन यांसारखी वैशिष्ट्ये मारुती फ्रॉन्क्स कॉम्पॅक्ट या कारमध्ये उपलब्ध असतील.
टाटा पंच
ही कार टाटा पंचशी टक्कर देईल, जी भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे, या कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन आहे. या कारची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.
महत्त्वाच्या बातम्या :