एक्स्प्लोर

Upcoming Mahindra Scorpio : मोठ्या कुटुंबासाठी एकदम बेस्ट! महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकचा S5 व्हेरिएंट होणार लॉन्च, जाणून घ्या सविस्तर

Upcoming Mahindra Scorpio Classic S5: महिंद्राने गेल्या वर्षी आपली स्कॉर्पिओ एसयूव्ही एका नवीन अवतारात लॉन्च केली होती. आता महिंद्रा या एसयूव्हीसाठी मिड-स्पेक व्हेरिएंट S5 देखील लॉन्च करेल.

Upcoming Mahindra Scorpio Classic S5: वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या वर्षी आपली स्कॉर्पिओ एसयूव्ही एका नवीन अवतारात लॉन्च केली होती. यासोबतच नवीन SUV Scorpio-N देखील बाजारात विकली जात आहे. जी बाहेरून आणि आतून स्कॉर्पिओ क्लासिकपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या दोन्ही SUV कार सध्या बाजारात खूप लोकप्रिय आहेत. तसेच नवीन Scorpio N च्या आगमनानंतरही Scorpio Classic ची मागणी अजिबात कमी झालेली नाही.

Upcoming Mahindra Scorpio Classic S5: येणार नवीन व्हेरिएंट 

नवीन RDE मानकांची पूर्तता करण्यासाठी कंपनी लवकरच आपल्या Scorpio Classic मधील इंजिन अपग्रेड करेल. यासह महिंद्रा या एसयूव्हीसाठी मिड-स्पेक व्हेरिएंट S5 देखील लॉन्च करेल. हा नवीन S5 व्हेरिएंट याच्या खालच्या व्हेरिएंटच्या S आणि वरच्या S11 मधील स्पेस कव्हर करेल. सध्या याच्या बेस व्हेरियंटमध्ये फक्त 9-सीटर पर्याय मिळतो, तर याच्या नवीन S5 व्हेरिएंटमध्ये 7 आणि 9 सीटर पर्यायांमध्ये येईल.

Upcoming Mahindra Scorpio Classic S5: फीचर्स

Scorpio Classic S ला 9-सीटर लेआउट मिळतो. ज्यामध्ये दुसऱ्या रांगेत मॉडेल बेंच सीट्स आणि मागील बाजूस 2×2 बाजूच्या बेंच सीट्स आहेत. दुसरीकडे टॉप-स्पेक मॉडेल S11 मध्ये कॅप्टन आणि बेंच दोन्ही सीटचा पर्याय दुसऱ्या रांगेत उपलब्ध आहे. S5 ट्रिम देखील त्याच सीटिंग लेआउटसह येईल. तसेच नवीन प्रकारात कव्हर्स, ऑडिओ सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ORVM, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि ब्रेक असिस्टसह स्टील व्हील मिळण्याची शक्यता आहे.

Upcoming Mahindra Scorpio Classic S5: कसे असेल इंजिन?

Mahindra Scorpio Classic ला 2.2-लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळते. जे BS6 स्टेज II किंवा रिअल टाइम ड्रायव्हिंग उत्सर्जन मानदंड पूर्ण करण्यासाठी अपडेट केले जाईल. हे इंजिन 130bhp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कंपनी नवीन RDE नियमांनुसार Scorpio-N चे पेट्रोल आणि डिझेल इंजिन देखील अपडेट करेल.

Mg Hector: एमजी हेक्टरशी होणार स्पर्धा 

ही कार बाजारात MG Hector शी स्पर्धा करेल, जी 1.5 L, 4-सिलेंडर, पेट्रोल इंजिन आणि 2.0 L 4-सिलेंडर, डिझेल इंजिन पर्यायासह ऑफर केली जाते. यासोबतच अनेक अत्याधुनिक फीचर्सही यामध्ये उपलब्ध आहेत.

ऑटो संदर्भातील बातमी वाचाच : 

Upcoming Hyundai SUV: Hyundai ची micro SUV देणार Tata Punch ला टक्कर, जाणून घ्या कधी होणार लॉन्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Embed widget