Mahindra XUV 400: महिंद्रा XUV400 ची लोकांमध्ये मोठी क्रेझ, आतापर्यंत 15 हजाराहून अधिक युनिट्स बुक
Mahindra XUV 400 Booking: महिंद्राने अलीकडेच देशात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV XUV 400 लॉन्च केली आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये एकट्याने बाजारपेठेवर राज्य करणाऱ्या Tata Nexon EV ला कडवी स्पर्धा मिळत आहे.
Mahindra XUV 400 Booking: महिंद्राने अलीकडेच देशात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV XUV 400 लॉन्च केली आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये एकट्याने बाजारपेठेवर राज्य करणाऱ्या Tata Nexon EV ला कडवी स्पर्धा मिळत आहे. कारण लोकांना महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक SUV खूप आवडली आहे. अद्याप या कारची डिलिव्हरी सुरू झालेली नाही. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत Tata Nexon EV, MG ZS EV आणि Hyundai Kona Electric शी स्पर्धा करते.
Mahindra XUV 400 Booking: इतके युनिट्स झाले बुक?
महिंद्राने 26 जानेवारी 2023 पासून या कारसाठी बुकिंग विंडो उघडली आहे. पहिल्या पाच दिवसांतच या कारच्या 10 हजारांहून अधिक युनिट्सचे बुकिंग झाले होते, तर आतापर्यंत हा आकडा 15 हजार युनिट्सच्या पुढे गेला आहे. आधीच या कारसाठी 7 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. ग्राहक ही कार 21,000 रुपयांमध्ये बुक करू शकतात. कंपनी यावर्षी या कारच्या 20,000 युनिट्सची डिलिव्हरी करणार आहे.
Mahindra XUV 400 Booking: किती आहे रेंज?
Mahindra XUV400 मध्ये दोन बॅटरी पॅकचा पर्याय आहे. ज्यामध्ये 34.5kWh आणि 39.4kWh पर्यायांचा समावेश आहे. ही कार पूर्ण चार्ज झाल्यावर कंपनीने अनुक्रमे 375 किमी आणि 456 किमीची रेंज देणार असल्याचा दावा केला आहे. यात 34.5kWh बॅटरी पॅकसह 3.3kW आणि 7.2kW चा चार्जर आणि 39.4kWh बॅटरी पॅकसह फक्त 7.2kWh चार्जर आहे.
Mahindra XUV 400 Booking: फीचर्स
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या टॉप-स्पेक प्रकारात 7.0-इंच टचस्क्रीन, 6 एअरबॅग्ज, ISOFIX अँकरेज, सिंगल-पॅन सनरूफ, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, IP67 रेटिंग बॅटरी पॅक आणि ओव्हर-द-एअर (OTA) आहे. यात कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह इतर अनेक फीचर्स अपडेटसोबत देण्यात आले आहेत.
या कारशी होणार स्पर्धा
ही कार टाटा मोटर्सच्या Nexon EV Max शी स्पर्धा करते. Tata Nexon EV Max मध्ये 40.5kWh चा बॅटरी पॅक उपलब्ध आहे, 3.3kW आणि 7.2kW चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. 3.3kW चार्जरसह Nexon EV Max ची एक्स-शोरुम किंमत 16.49 लाख ते 18.49 लाख दरम्यान आहे, तर 7.2kW चार्जरसह EV Max ची बाजारातील किंमत 16.99 लाख ते 18.99 लाख दरम्यान आहे. ज्यामध्ये आता Nexon EV Max XM व्हेरियंटची किंमत 16.49 लाख, XZ+ व्हेरिएंटची किंमत 17.49 लाख, XZ+ लक्स व्हेरिएंटची किंमत 18.49 लाख, XZ+ व्हेरिएंटची किंमत 17.99 लाख, XZ+ लक्सची (7.2 kW) किंमत 19 लाख झाली आहे.