टाटाला टक्कर देण्यासाठी महिंद्राची मोठी तयारी, 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही करणार लॉन्च
Mahindra Electric Suv: भारतीय इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटा मोटर्सने आपली पकड मजबूत केली आहे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने हे टाटाचे विकले जातात.
Mahindra Electric Suv: भारतीय इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटा मोटर्सने आपली पकड मजबूत केली आहे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने हे टाटाचे विकले जातात. ग्राहक ही टाटाच्या इलेक्ट्रिक कार्सला पसंती देताना दिसत आहेत. अशातच भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटाला टक्कर देण्यासाठी वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने जोरदार तयारी केली आहे. महिंद्राने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटसोबत भागीदारी केली आहे. या दोन्ही कंपनींमध्ये 1925 कोटींचा करार झाला आहे.
कंपनी 15 ऑगस्ट रोजी आपली एक, दोन नाही तर पाच एसयूव्ही प्रदर्शित करणार आहे. लाँच होणाऱ्या 5 SUV कारमध्ये XUV400 चाही समावेश असेल. कंपनी या वर्षाच्या अखेरीस बाजारातही लॉन्च करू शकते. महिंद्राने एक नवीन कूप एसयूव्ही देखील प्रदर्शित केली आहे. जी महिंद्रा XUV900 इलेक्ट्रिक SUV कूप असू शकते.
आगामी काळात महिंद्रा अँड महिंद्रा भारतासह इतर देशांमधील इलेक्ट्रिक कार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार आणणार आहे. या कार प्रामुख्याने टाटा नेक्सॉन ईव्ही, नेक्सॉन ईव्ही मॅक्स आणि एमजी झेडएस सारख्या लोकप्रिय गाड्यांशी स्पर्धा करतील.
दरम्यान, महिंद्रानं (Mahindra) गेल्या महिन्यात 'बिग डॅडी' म्हणून प्रसिद्ध असलेली 'स्कॉर्पिओ एन' (Scorpio N) लॉन्च केली. ही SUV टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आली आहे. आता ग्राहकांना स्कॉर्पिओसाठी वाट पाहावी लागणार नाही, असं नुकतंच महिंद्रा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं 26 सप्टेंबरपासून बहुचर्चित एसयूव्हीची डिलीव्हरी सुरु करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :