येत आहे नवीन मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाईक, एका चार्जमध्ये गाठणार 300 किमीचा पल्ला
Eko Tejas E-Dyroth : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच आता अनेक नवीन भारतीय कंपन्या वाहन क्षेत्रात उतरल्या असून ते 100 टक्के मेड इन इंडिया वाहनांची निर्मिती करत आहेत.
Eko Tejas E-Dyroth : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच आता अनेक नवीन भारतीय कंपन्या वाहन क्षेत्रात उतरल्या असून ते 100 टक्के मेड इन इंडिया वाहनांची निर्मिती करत आहेत. यातच आता Eko Tejas ही वाहन उत्पादक कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने नुकतीच 'E-Dyroth' इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. जी एक हाय स्पीड क्रूझर इलेक्ट्रिक बाईक आहे. कंपनी डिसेंबर 2022 पासून आपली हाय-स्पीड इलेक्ट्रिक क्रूझर बाईक बाजारात आणणार आहे. कंपनीने आपली पहिली 'मेड इन इंडिया' ई-बाईक हार्ले डेव्हिडसनसारखीच डिझाइन केली आहे.
फीचर्स
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये स्मार्ट बॅटरी, कंट्रोलर आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहेत. याशिवाय अनेक स्मार्ट फीचर्ससह यात उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभवही उपलब्ध आहे. या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर देखील देण्यात आले आहे. ज्यामुळे बाईक स्मार्टफोनशी कनेक्ट करता येईल. बाईकच्या डॅशबोर्डमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि नोटिफिकेशन फीचरही देण्यात आले आहे.
Eko Tejas ने दावा केला आहे की, ही बाईक एका चार्जवर 150 किलोमीटरची रेंज देते. त्यात दुसरी बॅटरी जोडून रेंज 300 किमीपर्यंत वाढवता येते. ही बाईक 72V/60Ah लिथियम आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे. बाईकचा टॉप स्पीड 100 किमी/तास आहे. Ekko Tejas महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक यासह 10 भारतीय राज्यांमध्ये डीलरशिप चालवत आहे. कंपनीने E-Dyroth ची ऑनलाइन प्री-बुकिंग घेणे सुरू केले आहे.
दरम्यान, अलीकडेच Ultraviolette Automotive ने बाजारात आपली नवीन बाईक Ultraviolette F77 लिमिटेड एडिशन लॉन्च केली होती. अवघ्या दोन तासात ही बाईक सोल्ड आऊट झाली आहे. कंपनीने याच्या 77 युनिट्स अवघ्या दोन तासात विकल्या. F77 लिमिटेड एडिशनची किंमत 5.50 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 40.2 bhp पॉवर आणि 100 Nm टॉर्क जनरेट करते. 0 ते 60 किमी/ताशी वेग पकडण्यासाठी याला फक्त 2.8 सेकंद लागतात. तसेच ही बाईक 307 किमीची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
फक्त दोन तासांत विकली गेली ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स