(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jeep India Offer : जगात भारी ऑफर! जीप इंडियाच्या गाड्यांवर 12 लाखांपर्यंतची सूट मिळणार
Jeep India Discount Offer : जीप इंडियाने आपल्या गाड्यांवर धमाकेदार ऑफर दिल्या आहेत. लग्जरी गाडी ग्रँड चेरोकीवर 12 लाख रुपयांपर्यंतचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे.
Jeep India Discount Offer : तुम्हाला जर लक्झरियस जीप घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जीपप्रेमींसाठी आता जीप इंडिया कंपनीकडून विशेष सवलत दिली जात आहे. कंपनीकडून जीप कंपास कारवर 30 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. तर मेरिडियनवर 50 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.त्याचवेळी जीप इंडियाने ग्रँड चेरोकीवर (Grand Cherokee) सर्वात रोमांचक ऑफर आणली आहे. या वाहनावर 12 लाख रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या सर्व ऑफर फक्त जून महिन्यापुरत्या मर्यादित आहेत.
तुम्ही तुमच्या जवळच्या जीप इंडियाच्या डीलर्सकडून या ऑफर्सबद्दल अधिक माहिती मिळवू शकता, जेणेकरून तुम्हाला या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल.
जीप इंडियाच्या वाहनांवर ऑफर
जीप कंपासवर 15,000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहेत. याशिवाय या कारवर केवळ 15 हजार रुपयांचा विशेष डिस्काउंट मिळतोय. जीप मेरिडियनवर 20 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट उपलब्ध आहे आणि 30 हजार रुपयांचा विशेष डिस्काउंट दिला जात आहे. या विशेष ऑफर्सच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकता.
ग्रँड चेरोकीवर 12 लाखांपर्यंतचा डिस्काउंट
जून महिन्यात जीप इंडियाने आपल्या आलिशान कारवर दमदार ऑफर्स आणल्या आहेत. ग्रँड चेरोकीवर खास ऑफर दिली जात आहे. विशेष ऑफरमध्ये, या कारवर 12 लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत आणि तुम्ही जीप वेव्ह एक्सक्लुझिव्ह ओनरशिप प्रोग्राममध्ये देखील सामील होऊ शकता.
जीप इंडिया वाहनांची किंमत
जीप इंडियाकडे भारतीय बाजारपेठेत ग्रँड चेरोकी, मेरिडियन, कंपास आणि रँग्लर अशी चार वाहने आहेत. Grand Cherokee ची विशेष एक्स-शोरूम किंमत 68.50 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Meridian ची एक्स-शोरूम किंमत 29.49 लाख रुपयांपासून सुरू होते. जीप कंपासची एक्स-शोरूम किंमत 18.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर रँग्लरची एक्स-शोरूम किंमत 67.65 लाख रुपयांपासून सुरू होते.
ही बातमी वाचा: