first look review: ADAS फीचर, मोठी स्पेस आणि बरेच काही; अशी आहे नवीन Hyundai Tucson
Hyundai Tucson 2022 first look review: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hyundai नुकतीच आपली नवीन कार Tucson लॉन्च केली आहे.
Hyundai Tucson 2022 first look review: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hyundai नुकतीच आपली नवीन कार Tucson लॉन्च केली आहे. या कारसह कंपनीची आता प्रीमियम वाहनांच्या सेगमेंटमध्ये आपली वाटचाल सुरू केली आहे. नवीन टक्सन ही ऑल-न्यू जनरेशन मॉडेल आहे. कशी आहे नवीन Tucson? याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन काय आहे. याचाच संपूर्ण रिव्ह्यू आपण जाणून घेणार आहोत.
ही 5-सीटर एसयूव्ही आहे. जी भारतात विक्रीसाठी आपल्या लांब व्हीलबेस आवृत्तीसह लॉन्च करण्यात आली आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ही कार दिसायला मोठी दिसते. 4630mm ची लांबी याच्या आकाराची पुष्टी करते. आधीच्या टक्सनच्या तुलनेत नवीन Hyundai डिझाइन खूप आकर्षक आहे. ही कार दिसायला स्पोर्टी असून याच्या समोरील बाजूची लोखंडी ग्रील खूप छान दिसते.
यात मोठी स्पेस मिळते, जी ग्राहकांना आकर्षित करेल. याची कॅप्टन सीट ले-आउट नसून बेंच सीट आहे. यात लेगरूम/हेडरूमच्या दृष्टीने जागा ग्राहकांना आवडेल इतकी देण्यात आली. याशिवाय तुम्ही दुसऱ्या रांगेतील सीटला थोडेसे मागे टेकवू शकता आणि अगदी समोरच्या प्रवासी सीटला मागच्या बाजूने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हलवू शकता.
यातील काही तपशील जसे की, पॅडवरील रेषांशी जुळणारे रुंद एअरकॉन व्हेंट्स चांगले आहेत. फ्लोटिंग डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि वेगळे फोर-स्पोक स्टीयरिंग व्हील हे इतर हायलाइट्स दिले असताना यात जास्त बटणे मिळत नाहीत. दरवाजाच्या पॅड देखील स्पर्श करताना सॉफ्ट वाटतो.
सेंट्रल स्क्रीन ग्लॉस ब्लॅक पॅनेलमध्ये 10.25-इंच युनिट आहे. तर खाली टच बेस्ड बटणे आहेत. भारतात कोणत्याही कारमध्ये स्टोरेज क्षमता पाहिली जाते, जी यात चांगली मिळते. ग्लॉस ब्लॅक पॅनेल स्क्रॅच लागण्याची भीती आहे. मात्र याची टचस्क्रीन कार्यक्षमता चांगल्या दर्जाची आहे.
Hyundai ची नवीन कार एकाहून एक अशा जबरदस्त फीचर्सने भरलेली आहे. यात तुम्हाला एक मोठा पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक आणि बरेच फीचर्स मिळेल. यात हीटिंग आणि कूलिंगसह ड्युअल पॉवर सीट्स आहेत. तसेच यात 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग, मल्टी एअर मोड म्हणजे हवेचा प्रवाह मल्टिपल व्हेन्स, 8-स्पीकर BOSE ऑडिओ सिस्टम, अलेक्सा/ Google Voice असिस्टंट, OTA अपडेट्स, इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी मल्टी लँग्वेज आणि बरेच काही मिळते.
यात तुम्हाला सर्वात खास ADAS फीचर मिळणार आहे. या फीचरमध्ये तुम्हाला सुरक्षितता वाढवण्यासाठी स्मार्टसेन्स 360 डिग्री कॅमेरा मिळले. एकूण 19 ADAS फीचर्स यात आहेत.
तसेच यात तुम्हाला 2.0l पेट्रोल इंजिन मिळेल. जे 156ps/192 Nm जनरेट करते. हे 6-स्पीड ऑटो आहे. यात तुम्हाला डिझेल इंजिन देखील मिळते. जे अधिक पॉवरफुल इंजिन आहे. हे 8-स्पीड ऑटोसह 186ps/416Nm जनरेट करते. दरम्यान, एकंदरीतच नवीन टक्सनमध्ये मोठी स्पेस, मोठा आकार डिझाइन आणि बरेच फीचर्स मिळतात. याचे ADAS फंक्शन्स आम्हाला आवडले. याची किंमत योग्य असल्यास ही कार याच्या सेगमेंटमध्ये लोकप्रिय पर्याय ठरू शकते.