एक्स्प्लोर

Gogoro आणणार जगातील पहिली सॉलिड-स्टेट टू व्हिलर बॅटरी, Hero MotoCorpला होणार 'हा' फायदा

World’s First Solid State Battery : Gogoro ने अनावरण नुकतीच बाजारात जगातील पहिली सॉलिड-स्टेट लिथियम-सिरेमिक बॅटरी आणली आहे.

World’s First Solid State Gogoro Battery : तैवानची इलेक्ट्रिक स्कूटर आणि बॅटरी स्वॅपिंग कंपनी 'गोगोरो'ने (Gogoro) इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी (Electric Vehicle) डिझाइन केलेल्या जगातील पहिल्या सॉलिड-स्टेट बॅटरीचा नमुना आणला आहे. नुकताच कंपनीने सॉलिड-स्टेट बॅटरी लिथियम सिरॅमिक स्वॅपेबल बॅटरीच्या नमुन्याचे अनावरण केले आहे. ही बॅटरी (Prototype) तैवानची बॅटरी तंत्रज्ञान कंपनी ProLogium टेक्नॉलॉजीच्या संयोगाने विकसित करण्यात आली आहे. ProLogium टेक्नॉलॉजी जगातील एकमेव सॉलिड-स्टेट बॅटरी उत्पादक देखील आहे.

या बॅटरीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही बॅटरी Gogoro Electric Two Wheeler सोबत अनुरुप (Compatible) करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. गोगोरोच्या मते, लिथियम-सिरेमिक बॅटरियां, त्यांच्या पारंपारिक लिथियम-आयन समकक्षांच्या तुलनेत, उच्च ऊर्जा घनता निर्माण करते, ज्यामुळे अधिक मोठी रेंज मिळते. ही बॅटरी रिव्हर्स कंपॅटिबिलिटीसह जोडली गेलेली आहे यामुळे तुम्ही केवळ बॅटरी पॅकवर EV ची चांगली रेंज गाठू शकता. 

गोगोरो (Gogoro) कंपनीने असेही म्हटले आहे की, ही नवीन बॅटरी त्यांच्या गोगोरोच्या सध्याच्या वाहनांच्या बॅकवर्डला अनुरुप असेल. कंपनीने पुढे सांगितले की, सध्याच्या लिथियम बॅटरीची क्षमता 140 टक्के किंवा त्याहून अधिक वाढवण्यात येईल. लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत, सॉलिड-स्टेट लिथियम सिरेमिक बॅटऱ्या वापरण्यास सुरक्षित आणि अधिक स्थिर आहेत. नवीन सॉलिड-स्टेट बॅटरी अद्याप एक प्रोटोटाईप असला, तरीही गोगोरोने नवीन तंत्रज्ञानासह त्याचे लाइनअप अपग्रेड करण्यास जास्त वेळ लागणार नाही.

भारतात गोगोरो (Gogoro) आणि हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संयुक्त उपक्रमाची घोषणा केली. या संयुक्त उपक्रमात हिरो मोटोकॉर्पची बहुसंख्य भागीदारी आहे. या भागीदारीचा उद्देश गोगोरोचे बॅटरी-स्वॅपिंग नेटवर्क आहे. यामुळे भविष्यात हिरो मोटोकॉर्पला फायदा मिळेल. येत्या काळात ही सॉलिड-स्टेट बॅटरी Hero MotoCorp इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा एक महत्त्वाचा भाग बनू शकते शकते. याचा एक भाग म्हणजे हिरो कंपनी या वर्षी जुलैमध्ये लाँच करणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक टू व्हिलरकडे पाहता येईल.

Gogoro सध्या 2,300 हून अधिक ठिकाणी 10,000 पेक्षा जास्त बॅटरी स्वॅपिंग GoStations व्यवस्थापित करण्याचा दावा करते. शिवाय तैवानमधील 95 टक्के इलेक्ट्रिक दुचाकी गोगोरोच्या इकोसिस्टमद्वारे कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांची बॅटरी स्वॅपिंग इकोसिस्टम अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे कार्यरत असल्याचाही कंपनीचा दावा आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget