Citroen C3 Price Hike : Citroen ने वाढवली C3 कारची किंमत; ग्राहकांना 17 हजार रुपये जास्त मोजावे लागणार
Citroen C3 Price Hike : Citroen C3 हे हाय-स्पेक 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनवर आधारित आहे जे 110 hp पॉवर आणि 190 Nm टॉर्क निर्माण करते.
Citroen C3 Price Hike : फ्रेंच ऑटोमेकर कार निर्माता कंपनी Citroen ने 20 जुलै 2022 रोजी Citroen C3 कार लॉन्च केली. अल्पावधीतच ही कार अनेक ग्राहकांच्या पसंतीस आली होती. मात्र, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने या कारची किंमत वाढवली आहे. या कारसाठी ग्राहकांना आता तब्ब्ल 17,000 रूपये अधिक मोजावे लागणार आहेत. मात्र, कारची किंमत का वाढवली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
नवीन कारची किंमत किती?
Citron C3 चे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन-लीव्ह व्हेरिएंट पूर्वी 5.71 लाख रुपयांच्या किंमतीसह उपलब्ध होते. मात्र, वाढीनंतर आता त्याची एक्स-शोरूम किंमत 17,000 रुपयांनी वाढून 5.88 लाख रुपये झाली आहे. तर, त्याचे 1.2 लीटर फील पेट्रोल व्हेरिएंट आता 6.63 लाख रुपयांऐवजी 6.80 लाख रुपयांना मिळेल. तसेच, त्याच्या 1.2 लीटर टर्बो पेट्रोल फील व्हेरियंटची किंमत 9,000 रुपयांनी वाढली आहे आणि आता ती 8.15 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर उपलब्ध आहे.
दोन इंजिन पर्याय उपलब्ध
Citroen C3 हे हाय-स्पेक 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनवर आधारित आहे जे 110 hp पॉवर आणि 190 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच लो-स्पेक एस्पिरेटेड 1.2L पेट्रोल इंजिन, जे 82hp पॉवर आणि 115Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड आणि 6-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनचा ऑप्शन आहे.
कारचे फीचर्स
यात मिरर स्क्रीन टेक्नॉलॉजीसह 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याबरोबरच Citroen C3 मध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्टीयरिंग व्हीलवर ऑडिओ आणि फोन कंट्रोल, रिमोट कीलेस एंट्री, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॉवर विंडो, उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
Citroen C3 मध्ये 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 82 hp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 19.8 kmpl चे मायलेज देते. यात 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे 110 एचपी पॉवर आणि 190 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.
महत्वाच्या बातम्या :