Tata Safari Electric: Tata Safari इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च होणार, जाणून घ्या काय असेल खास
Tata Safari Electric: मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा सफारीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच बाजारात आणणार आहे.
Tata Safari Electric: देशातील प्रवासी इलेक्ट्रिक कार विभागात वर्चस्व गाजवणाऱ्या टाटा कंपनीला (Tata Company) आणखी एका इलेक्ट्रिक कारच्या माध्यमातून आपला दबदबा कायम ठेवायचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारमध्ये अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात तसेच यात नवीन तंत्रज्ञान देखील दिले जाऊ शकते. Tiago नंतर आता कंपनी आपली SUV इलेक्ट्रिक कार बनवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा सफारीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच बाजारात आणणार आहे. टाटा कंपनी आपल्या विद्यमान लोकप्रिय मॉडेल्सना इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये अपडेट करून बाजारात गुंतलेली आहे. टाटांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनली आहे. ही टाटा कार XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux या चार प्रकारांमध्ये सादर करण्यात आली होती आणि तिची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. टाटा कंपनीने 10 ऑक्टोबरपासून या कारचे बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच डिलिव्हरीही लवकर देण्यास सांगितले आहे.
सफारीला देशात खूप पसंती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी भविष्यातील इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये फोर व्हील तंत्रज्ञानाचाही वापर करू शकते. सध्या कंपनी आपल्या काही SUV मध्ये याचा वापर करत नाही, पण भविष्यात या SUV ला फोर व्हील ड्राइव्हचा पर्याय दिला जाऊ शकतो. टाटा सफारी इलेक्ट्रिक कारसह भविष्यात अधिकाधिक इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या योजनेवर टाटा काम करत आहे. सफारीला देशात खूप पसंती दिली जाते. सफारी मुख्यतः टाटा हॅरियर एसयूव्हीचा 7-सीटर प्रकार आहे. टाटा कंपनीची भविष्यातील योजना त्यांच्या कारमध्ये 4WD फीचर आणण्याची आहे.
Tata Safari ची एक वेगळी ओळख
Tata Safari ची भारतातील SUV प्रेमींमध्ये एक वेगळी ओळख आहे. कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये सफारी भारतीय बाजारपेठेत पुन्हा लाँच केली. याआधीही कंपनीने 1998 मध्ये सफारी पहिल्यांदा भारतीय बाजारात आणली होती. तेव्हापासून ही कार आवडणाऱ्यांची कमतरता नव्हती. पण या एसयूव्हीच्या सेकंड जनरेशन व्हर्जनलाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच, कंपनीला इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सर्व प्रकारचे पर्याय द्यायचे आहेत, त्यामुळे लवकरच ते EV म्हणूनही सादर केले जाईल अशी अपेक्षा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार