लवकरच बाजारात येणार Citroen C3 Aircross कार; बुकिंग 'या' महिन्यापासून सुरू
Citroen C3 Aircross : जर तुम्ही या सणासुदीच्या दिवसांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे SUV खरेदी करण्याचे अनेक मोठे पर्याय उपलब्ध आहेत.
Citroen C3 Aircross : फ्रेंच कार उत्पादक कंपनी Citroen आपली पॉवरफुल SUV, Citroen C3 Aircross लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. अलीकडेच, कंपनीने या संदर्भात घोषणा केली आहे, त्यानुसार कंपनी सप्टेंबर महिन्यापासून या कारची बुकिंग सुरू करणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यापासून या कारची डिलिव्हरी सुरू होईल. Citroen C3 Aircross ची डिलिव्हरी या वर्षीच्या सणासुदीच्या दिवसांपासून सुरू होईल. जर तुम्ही या सणासुदीच्या दिवसांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे SUV खरेदी करण्याचे अनेक मोठे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एक आहे कार म्हणजेच Citroen C3 Aircross.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही कार 10 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केली जाईल. यात 4 मोनोटोन बॉडी कलर तसेच 6 ड्युअल टोन पर्यायांचा समावेश आहे. याशिवाय कंपनी या कारमध्ये 1.2 लीटर Gen 3 Puretech टर्बो पेट्रोल इंजिन देईल. हे इंजिन 110ps ची कमाल पॉवर आणि 190nM कमाल टॉर्क जनरेट करेल. या कारमध्ये ग्राहकांना 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात येणार आहे.
Citroen C3 Aircross चे मायलेज किती असेल?
ARAI नुसार, या कारचे प्रमाणित मायलेज 18.5 kmph आहे. ही कार अद्याप भारतात लाँच झालेली नसली तरी तिची किंमत 9 ते 14 लाखांच्या दरम्यान असल्याचे मानले जात आहे. ही कार लॉंच झाल्यानंतर या कारची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन तैगन या कारबरोबर होणार आहे.
Citroen C3 Aircross ची वैशिष्ट्ये काय आहेत?
कारला 7-इंचाचा कलर डिजिटल TFT क्लस्टर मिळेल. याशिवाय कारला मिनिमल, इको ड्राइव्ह आणि ड्युअल मोड मिळेल. कारमध्ये LED DRL, 17 इंच अलॉय व्हील, मल्टी फंक्शनिंग स्टीयरिंग व्हील आणि रूफ माउंटेड एसी व्हेंट्स देखील मिळतील.
2019 मध्ये कंपनी पहिल्यांदा भारतात आली होती आणि 2021 मध्ये कंपनीने पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत Citroen C5 Aircross लाँच केले होते. यानंतर, कंपनीने 2022 आणि 2023 मध्ये C3 Hatchabck आणि त्याची सर्व-इलेक्ट्रिक आवृत्ती e23 लॉन्च केली.
महत्त्वाच्या बातम्या :