Car Tips : 'हे' काम न केल्यास तुमची कार खराब होईल; बदलत्या हवामानात कारची काळजी कशी घ्याल? वाचा खास टिप्स
Car Tips and Tricks : कार किंवा बाईक खरेदी करण्यासोबतच त्याची देखभालही योग्य प्रकारे घेतली पाहिजे. काळजी न घेतल्यास या बदलत्या वातावरणात कार आणि दुचाकीचे नुकसान होण्याची शक्यता असते.
Car Tips and Tricks : देशात काही ठिकाणी मान्सूनचे दमदार आगमन झालं आहे तर काही ठिकाणी अद्यापही उष्णतेच्या झळा बसत आहेत. या बदलत्या वातावरणात कार किंवा बाईकची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरते. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या कारची किंवा बाईकची काळजी कशी घ्यायची (How To Take Care Of Car In Monsoon) याबद्दल काही टिप्स आम्ही देत आहोत.
गाडी रोज स्वच्छ करा
कार किंवा बाईक चालवण्यासोबतच त्याची साफसफाई करत राहणे खूप गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा कार स्वच्छ कापडाने पुसली पाहिजे. यासोबतच कार दर सहा महिन्यांनी सर्व्हिसिंग करावी आणि त्यावर वॅक्स ट्रिटमेंटही द्यावी. यामुळे रस्त्यावरील धुळीमुळे तुमच्या कारचा रंग खराब होणार नाही आणि कार नेहमी चकचकीत दिसेल.
कारची सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक
दर सहा महिन्यांनी किंवा कारने पाच हजार किमीचा प्रवास केल्यानंतर ती नियमित देखभालीसाठी पाठवली पाहिजे. देखभालीच्या वेळी, कारचे ऑईल बदलावे आणि जो भाग योग्यरित्या काम करत नाही तो देखील बदलला पाहिजे. तसेच कारमध्ये बसवलेले एसी फिल्टर तपासा. जर एसी फिल्टर घाण झाले असेल तर तो देखील बदलून घेणं आवश्यक आहे.
गाडीचे ब्रेक तपासा
चालकाने स्वत: कारच्या ब्रेकची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या गाडीचे ब्रेक नीट काम करत नाहीत असे वाटेल तेव्हा ताबडतोब मेकॅनिककडून गाडीचे ब्रेक दुरुस्त करून घ्या.
टायरची विशेष काळजी घ्या
टायर हा वाहनाचा एकमेव भाग आहे जो रस्त्याच्या थेट संपर्कात येतो. चांगल्या ड्रायव्हिंगसाठी टायरने योग्य कार्य करणे आवश्यक आहे. टायरचे प्रेशरही वेळोवेळी तपासले पाहिजे. उन्हाळ्यात टायर जास्त तापल्याने फुटण्याचा धोका असतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी टायरचा दाब संतुलित करणे आवश्यक आहे.
कोणत्याही आवाज किंवा गळतीकडे दुर्लक्ष करू नका
जर तुमची कार आवाज करत असेल किंवा कुठूनतरी द्रव गळतीचा वास येत असेल किंवा कारमधून कोणतेही द्रव बाहेर येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सुरुवातीलाच मेकॅनिककडून त्याची दुरुस्ती करून घ्या. त्याला उशीर झाल्यास नंतर जास्त पैसे खर्च करावे लागतील.
ही बातमी वाचा: