(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Electric Bike: एका चार्जमध्ये 200 KM गाठते 'ही' इलेक्ट्रिक बाईक; किंमत कमी, फीचर्स जबरदस्त
Electric Bike: नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Oben EV ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने याचे नाव Oben Rorr असे ठेवले आहे.
Electric Bike: नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Oben EV ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने याचे नाव Oben Rorr असे ठेवले आहे. याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 200 किमी पर्यंतची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच याची बॅटरी फक्त 2 तासात पूर्ण चार्ज होते. या बाईकची प्री-बुकिंग 18 मार्चपासून सुरू होणार आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 999 रुपयांमध्ये ही बाईक बुक करू शकतात.
नवीन Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक फुल-लोडेड सिंगल व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही बाईक सात राज्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. प्रत्येक राज्यानुसार याची किंमत कमी-जास्त असू शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, या बाईकची टेस्ट ड्राइव्ह मे महिन्यात सुरू होईल. तसेच ग्राहकांना याची डिलिव्हरी जुलै 2022 मध्ये करण्यात येणार आहे. भारतात याची स्पर्धा Revolt Motors RV 400 आणि Komaki M-5 आणि OLA S1 या इलेक्ट्रिक बाईकशी होणार आहे.
3 सेकंदात पकडते 0 -100kmph
याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर, यात 4.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 10 kW इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेला आहे. ही मोटर 62Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यासोबतच ही बाईक फक्त 3 सेकंदात 0 - 40 किमी प्रतितास वेग पकडते. या बाईकमध्ये इको, सिटी आणि हॅवक असे तीन राइडिंग मोड आहेत. याची टॉप स्पीड 100 किमी प्रतितास इतका आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 200 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. तसेच याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 2 तास इतका वेळ लागतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maruti Suzuki Car Discount: मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळत आहे जबरदस्त सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
- इस तारीख को लॉन्च होगी Royal Enfield की नई बाइक, करीब 1.90 लाख रुपये हो सकती है कीमत
- Electric Vehicle Policy : मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचं उद्दिष्ट; पाच हजार चार्जिंग स्टेशन्स!
- Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज
- Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero