ऑडीकडून A4 Signature Edition लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Audi A4 Signature Edition : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने ऑडी ए४ सिग्नेचर एडिशनच्या लाँचची घोषणा केली आहे.

Audi A4 Signature Edition : जर्मन लक्झरी कार निर्माता उत्पादक कंपनी ऑडीने आपल्या लोकप्रिय सेडान Audi A4 च्या सिग्नेचर एडिशनच्या लाँचची घोषणा केली आहे. या खास एडिशनमध्ये प्रीमियम डिझाइन घटक समाविष्ट असून, कारच्या लुकमध्ये आणि आकर्षकतेत मोठी भर घालणारी वैशिष्ट्ये आहेत. सिग्नेचर एडिशनमध्ये विशेष स्टायलिंग अपडेट्ससह, Audi Rings LED वेलकम लॅम्प्स, विशेष डेकल्स, आणि डायनॅमिक व्हील हब कॅप्स यांसारखी अनेक नवीन आकर्षक वैशिष्ट्ये मिळतात. लक्झरी कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ही कार एक चांगला पर्याय ठरू शकते.
Audi A4 Signature Edition ची प्रारंभिक किंमत ₹57,11,000 (एक्स-शोरूम) असून, ही कार मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध आहे. ही एडिशन फक्त टेक्नॉलॉजी व्हेरिएंटमध्ये येते आणि यामधील सिग्नेचर वैशिष्ट्ये Audi Genuine Accessories चा भाग आहेत. ही कार पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे – ग्लेशियर व्हाईट मेटॅलिक, मिथोस ब्लॅक मेटॅलिक, नवारा ब्ल्यू मेटॅलिक, प्रोग्रेसिव्ह रेड मेटॅलिक आणि मॅनहॅटन ग्रे मेटॅलिक.
ऑडी A4 Signature Edition ची खास वैशिष्ट्ये
- पार्क असिस्ट आणि ३६०-डिग्री कॅमेऱ्यासह अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ड्रायव्हिंगचा अनुभव
- वूड ओक आणि नॅचरल ग्रे या आकर्षक शेड्समध्ये नवीन डेकोरेटिव्ह इनलेज
- आकर्षक वेलकम प्रोजेक्शन तयार करणारे नवीन ऑडी रिंग्स एंट्री एलईडी लॅम्प्स
- अधिक प्रभावी ब्रँड उपस्थितीसाठी खास ऑडी रिंग्स डेकल्स
- चाक फिरत असतानाही ऑडी लोगो अचूक स्थितीत ठेवणारे डायनॅमिक व्हील हब कॅप्स
- केबिनमध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण करणारा प्रीमियम फ्रॅग्रन्स डिस्पेन्सर
- वाहनाला अधिक गतीशील रूप देणारा अॅरोडायनॅमिक स्पॉयलर लिप
- व्हेईकल अॅक्सेसला अधिक आकर्षक बनवणारे कस्टमायझेबल की कव्हर्स, विविध रंगांच्या पर्यायांसह
- स्पोर्टी लुकसाठी स्टेनलेस स्टीलचे पेडल कव्हर्स
- अधिक आकर्षक शैलीसाठी खास डिझाइन असलेले अलॉय व्हील पेंट
ऑडी A4 चे इंजिन व तांत्रिक वैशिष्ट्ये
- 2.0 लिटर TFSI इंजिन, 204 HP शक्तीसह आणि 320 Nm टॉर्क
- 0 ते 100 किमी/तास फक्त 7.1 सेकंदांत
- 241 किमी/तासची कमाल गती
- 12-वोल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टम – इंधन कार्यक्षमतेत वाढ
- ब्रेक रिकुपरेशन तंत्रज्ञान – इंधन बचतीसाठी
आधुनिक तंत्रज्ञान व सोयी
- 3D साऊंडसह B&O प्रीमियम साऊंड सिस्टीम (19 स्पीकर्स, 755 वॅट आउटपुट)
- फ्लॅट बॉटम स्पोर्टी मल्टीफंक्शन लेदर स्टिअरिंग
- 25.65 सेमीचा MMI टच डिस्प्ले – अॅकॉस्टिक फीडबॅकसह
- ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
- नैसर्गिक भाषा ओळखणारे व्हॉईस कंट्रोल
- ऑल-डिजिटल व्हर्च्युअल कॉकपिट प्लस
- अॅम्बियंट लाइटिंग – 30 रंगांचे पर्याय
- कम्फर्ट की – कीलेस एन्ट्री आणि बूट लिडसाठी जेश्चर-आधारित ओपनिंग
- वायरलेस चार्जिंगसह Audi Phone Box
- लेदर व लेदरेट अपहोल्स्ट्री व वुड फिनिश इनलेज
- मेमरी फंक्शनसह पॉवर्ड फ्रंट सीट्स
- थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल
ग्राहकांना खास अनुभव देण्याचा प्रयत्न
दरम्यान, याबाबत ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन म्हणाले की, “Audi A4 ही आमच्या सेडान पोर्टफोलिओमधील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. सिग्नेचर एडिशनमधून आम्ही ग्राहकांना अधिक खास अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत. या बीस्पोक एडिशनमधील स्टायलिंग एलिमेंट्स कारच्या प्रीमियम अपीलमध्ये भर घालतात आणि सौंदर्यदृष्टी असलेल्या ग्राहकांसाठी आदर्श ठरतात.”
आणखी वाचा
हौसेला मोल नाही! कार घ्यायला थेट हेलिकॉप्टरनं एन्ट्री; गाडीची किंमत ऐकून व्हाल थक्क























