एक्स्प्लोर

Ather 450X चा लाँग रेंज मॉडेल लवकरच होणार लॉन्च, एका चार्जमध्ये गाठणार 146 किमीचा पल्ला

Ather Energy New Scooter: इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी Ather Energy आपली 450X इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या बॅटरीसह लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

Ather Energy New Scooter: इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी Ather Energy आपली 450X इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या बॅटरीसह लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. Ather ची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर 450X सध्या 2.9 kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीसह येते. ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 116 किमीची रेंज देते. Ather 450X ची किंमत 1.38 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Ather 450X 3.66 kWh च्या लिथियम-आयन बॅटरीसह आणली जाऊ शकते. या मोठ्या बॅटरीसह, स्कूटरची रेंज 146 किलोमीटरपर्यंत असण्याचा अंदाज आहे. एका रिपोर्टनुसार, Ather ने नवीन 450X ई-स्कूटरचे उत्पादन सुरू करण्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून परवानगी देखील घेतली आहे.

नवीन Ather 450X मध्ये चार ते पाच वेगवेगळे रायडिंग मोड दिले जातील, असे सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत एथरने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. सध्याचे Ather 450X साडेतीन तासांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तसेच चार्ज केल्यानंतर केवळ 10 मिनिटांत ही स्कूटर 15 किमी धावू शकते. Ather 450X ची टॉप स्पीड 80 kmph इतकी आहे. ही स्कूटर 26 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते, जी 350 सीसी बाईकच्या समतुल्य आहे. ही स्कूटर 0-60 किमी/ताशी 6.50 सेकंदात गती प्राप्त करते.

अलीकडेच कंपनीने Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) लाँच केले आहे. हे फीचर स्कूटरवर अॅक्सेसरी म्हणून उपलब्ध असेल ज्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त किंमत मोजावी लागेल. Ather 450X मधील TPMS साठी ग्राहकांना 5,000 रुपयांची अतिरिक्त किंमत मोजावी लागेल.

Ather ने भारतीय शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीच्या EV चार्जिंग प्लेयर मॅजेन्टा चार्जग्रिडशी हातमिळवणी केली आहे. ही भागीदारी एथरला भारतातील अनेक मॅजेन्टा चार्जग्रिड स्थानांवर प्रवेश देईल. Magenta ChargeGrid सध्या भारतातील 35-40 शहरांमध्ये चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करत आहे. ज्याचे लक्ष FY2023 च्या अखेरीस सुमारे 11,000 चार्जर्सचे नेटवर्क स्थापन करण्याचे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Embed widget