एक्स्प्लोर

Car Tips: एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय,  8 लाखांच्या आत बजेट, हे घ्या 5 बेस्ट पर्याय

SUV Cars in India : एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय, बजेट आठ लाखांच्या आतमध्ये आहे.. तुमचा शोध इथे संपणार आहे. आम्ही तुम्हाला पाच लो बजेट एसयूव्ही कारबद्दल माहिती सांगणार आहोत.

5 Best SUV Cars in India : एसयूव्‍ही कार घ्यायचा विचार करताय, बजेट आठ लाखांच्या आतमध्ये आहे.. तुमचा शोध इथे संपणार आहे. आम्ही तुम्हाला पाच लो बजेट एसयूव्ही कारबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्‍यामुळे तुम्‍हाला तुमच्‍या पैशांची बचत होईल. आजच्‍या बाजारपेठेत तुमच्‍या गरजा व बजेटची पूर्तता करणाऱ्या विश्‍वसनीय एसयूव्‍हीचा शोध घेणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक असू शकते. पण, विविध पर्याय उपलब्‍ध आहेत, जे खिशावर अधिक भार न देता प्रभावी वैशिष्‍ट्यांनी युक्‍त आहेत. 

1. रेनॉ कायगर, किंमत: ५,९९,९९० रूपये (एक्‍स-शोरूम)

जागतिक दर्जाचे १.० लीटर टर्बो पेट्रोल व १.० लीटर एनर्जी पेट्रोल इंजिनची शक्‍ती असलेली रेनॉ कायगर सुधारित ड्रायव्हिंग अनुभव आणि आरामदायीपणा देते. रेनॉ कायगरमध्‍ये एक्‍स-ट्रॉनिक सीव्‍हीटी व ५ स्‍पीड ईजी-आर एएमटी ट्रान्‍समिशन आहे. कायगर किफायतशीर मेन्‍टेनन्‍ससह कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागातील सर्वात परवडणारी कार आहे. कायगर उच्‍च दर्जाची कार्यक्षमता व स्‍पोर्टी ड्राइव्‍ह देते, तसेच या वेईकलमध्‍ये २०.६२ किमी/लीटरची बेस्‍ट-इन-सेगमेंट इंधन कार्यक्षमता आहे. सुरक्षिततेसंदर्भात रेनॉ कायगरला ग्‍लोबल एनसीएपीने अडल्‍ट प्रवाशी सुरक्षिततेसाठी ४-स्‍टार सेफ्टी रेटिंगसह पुरस्‍कारित केले आहे. ड्रायव्‍हर व पुढील आसनावरील प्रवाशाच्‍या सुरक्षिततेसाठी रेनॉ कायगरमध्‍ये चार एअरबॅग्‍ज, प्री-टेन्‍शनरसह सीटबेल्‍ट्स आणि ड्रायव्‍हरसाठी लोड-लिमिटर आहे.

2. टाटा पंच, किंमत:६,१२,९०० रूपये (एक्‍स-शोरूम)

सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीमधील नवीन कार आहे टाटाची आधुनिक शहरी स्‍क्रॅम्‍बलर पंच. फक्‍त ६.६३ लाख रूपयांपासून सुरू होणारी पंच निर्माण दर्जा किंवा इक्विपमेंटसंदर्भात तडजोड न करता किफायतशीर दरामध्‍ये एसयूव्‍हीचा उत्‍साह देते. इंटीरिअरमधून टाटाचा टेक्‍स्‍चर्ड पृष्‍ठभाग व लक्षवेधक डिझाइनसह दर्जावरील नवीन फोकस दिसून येतो. स्‍टोरेज स्‍पेसेसमध्‍ये वाढ करण्‍यात आली असून केबिन उत्‍साहपूर्ण आहे, ज्‍यामध्‍ये मोठ्या खिडक्‍या अधिक उत्‍साहाची भर करतात. या कारमध्‍ये पूर्णत: डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, पुश-बटन स्‍टार्ट, ऑटो हेडलॅम्‍प्‍स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. आता फक्‍त पेट्रोल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या या कारमधील ५-स्‍पीड मॅन्‍युअलच्‍या माध्‍यमातून ८६ बीएचपी शक्‍ती देणारे १.२ लीटर इंजिन प्रतिलिटर १८.९७ किमी अंतर पार करण्‍याची खात्री देते. 

3. ह्युंदाई एक्‍स्‍टर, किंमत: ६,१२,८०० रूपये (एक्‍स-शोरूम)

ह्युंदाई एक्‍स्‍टर आणखी एक परवडणारी एसयूव्‍ही आहे, जिची किंमत ६.१३ लाख रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होते. ह्युंदाई एक्‍स्‍टर ३ पॉवरट्रेन पर्यायांसह सुसज्‍ज आहे - ५-स्‍पीड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (५एमटी) व स्‍मार्ट ऑटो एएमटी (ऑटोमेटेड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन) सह उपलब्‍ध १.२ लीटर कप्‍पा पेट्रोल इंजिन (ई२० फ्यूएल रेडी) आणि ५-सपीड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशनने युक्‍त सीएनजी इंजिनसह १.२ लिटर बाय-फ्यूएल कप्‍पा पेट्रोल. नवीन एसयूव्‍हीमध्‍ये स्‍मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ व डॅशकॅमसह फ्रण्‍ट व रिअर कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा, ५.८४ सेमी (२.३१ इंच) एलसीडी डिस्‍प्‍ले, कनेक्‍टीव्‍हीटीवर आधारित स्‍मार्टफोन अॅप आणि मल्‍टीपल रेकॉर्डिंग मोड्स आहेत. ह्युंदाई एक्‍स्‍टर २६ सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह ग्राहकांना अपवादात्‍मक विश्‍वास देते. 

4. मारूती सुझुकी फ्रॉन्‍क्‍स, किंमत: ७,५१,००० रूपये (एक्‍स-शोरूम)

फ्रॉन्‍क्‍स विविध ग्राहकांच्‍या आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यासाठी अडवान्‍स्‍ड नेक्‍स्‍ट-जेन पॉवरट्रेन व ट्रान्‍समिशन पर्यायांसह येते. प्रोग्रेसिव्‍ह स्‍मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान असलेले नवीन १.० लीटर के-सिरीज बूस्‍टरजेट पेट्रोल इंजिन अधिक शक्‍ती व उत्‍साहाचा शोध घेणाऱ्या परफॉर्मन्‍स उत्‍साहींसाठी उपलब्‍ध असेल. फ्रॉन्‍क्‍समध्‍ये उच्‍च दर्जाचा, सुरक्षित, सोईस्‍कर व विनासायास ड्रायव्हिंग अनुभवासाठी अनेक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये आहेत. अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत जसे हेड अप डिस्‍प्‍लेसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ३६० व्‍ह्यू कॅमेरा, वायरलेस स्‍मार्टफोन चार्जर, २२.८६ सेमी (९ इंच) स्‍मार्ट प्‍ले प्रो+ इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह वायरलेस अॅप्‍पल कारप्‍ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्‍टीव्‍हीटी. फ्रॉन्‍क्‍स १० रंगांच्‍या विविध श्रेणीमध्‍ये उपलब्‍ध आहे, ज्‍यामध्‍ये मोनोटोन व ड्युअल-टोन पेंट शेड पर्यायांचा समावेश आहे.   

5. किया सोनेट, किंमत: ७,९९,००० रूपये (एक्‍स-शोरूम)

किया सोनेटने आकर्षक डिझाइन व अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह भारतातील बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केली आहे. सोनेटमध्‍ये शार्प डिझाइनचे विशिष्‍ट किया ट्रेट्स आणि उत्‍साही ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करणारी उत्तम इक्विपमेंट आहेत. ८.९८ लाख रूपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीसह ही कार विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे. सोनेटमध्‍ये एलईडी हेडलॅम्‍प्‍समधून दिसून येणारे सिग्‍नेचर टायगर नोज ग्रिल, आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करणारे एकीकृत डीआरएल आहेत. १६-इंच क्रिस्‍टल कट अलॉईज स्‍टाइल दर्जामध्‍ये अधिक भर करतात. ड्युअल-टोन केबिनमध्‍ये सर्वात मोठे दर्जात्‍मक टचस्क्रिनसह रिमोट स्‍टार्ट व साऊंड मूड लायटिंग आहे, जे कूल फॅक्‍टरमध्‍ये अधिक भर करतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget