(Source: ECI/ABP News/ABP Majha)
25 Years Of Honda City Sedan: होंडा सिटी कारला 25 वर्षे पूर्ण, 1998 मध्ये पहिली कार झाली होती लॉन्च
25 Years Of Honda City Sedan: भारतात वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये होंडाचे आपलं एक वगळ स्थान आहे. भारतात होंडाच्या अनेक कारला मोठी मागणी आहे. अशातच कंपनीच्या Honda City भारतात 25 पूर्ण झाली आहे.
25 Years Of Honda City Sedan: भारतात वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये होंडाचे आपलं एक वगळ स्थान आहे. भारतात होंडाच्या अनेक कारला मोठी मागणी आहे. अशातच कंपनीच्या Honda City भारतात 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. कंपनीने या कारचे पहिले मॉडेल 1998 साली लॉन्च केले होते. यानंतर यात अनेक अपडेटसह भारतीय बाजारात ही कार विकली जात आहे. कंपनीने ही कार वेळेनुसार अपडेट केली. त्याचे तंत्रज्ञान, डिझाइन सतत अपग्रेड केले गेले आहे. या कारच्या एकूण 9 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने आपले नवीन मॉडेल Honda City e:HEV सादर केले आहे. जी एक हायब्रिड कार म्हणून ओळखली जाते. यामध्ये अतिशय पॉवरफुल हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. चला गेल्या 25 वर्षाचा या कारचा प्रवास जाणून घेऊ.
फस्ट जनरेशन 1998-2003
होंडा सिटीचे फस्ट जनरेशन मॉडेल 1998-2003 दरम्यान भारतात आले आणि ते 6व्या जनरेशनच्या Honda Civic (FERIO) वर आधारित होते. VTEC Hyper 16 वॉल्व्ह इंजिन, ज्याने फर्स्ट जेन सिटी (HONDA CITY) मध्ये 106hp पीक पॉवर निर्माण कार्याचे, ती त्या काळातील सर्वात वेगवान कार होती.
सेकंड जनरेशन 2003-2008
होंडा सिटीच्या सेकंड जनरेशनची संकल्पना होंडा जॅझ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली होती. जी कारच्या मध्यभागी असलेल्या इंधन-टँकसह 'सेंटर टँक-लेआउट' म्हणून ओळखली जात होती. यामुळे सेकंड जनरेशन मॉडेल अधिक प्रशस्त, आरामदायी आणि इंधन कार्यक्षम होते. यात नवीन 1.5L i-DSI किंवा इंटेलिजेंट ड्युअल एंड सिक्वेन्शियल इग्निशन इंजिन देण्यात आले होते. याच्या CVT एडिशनमध्ये सेकंड जनरेशन होंडा सिटी देखील सादर करण्यात आली होती. या कारमध्ये ABS देखील होते. या काळात कारमध्ये केलेल्या या बदलामुळे HONDA CITY लोकप्रिय झाली.
थर्ड जनरेशन 2008 - 2013
होंडा सिटीची थर्ड जनरेशन पूर्णपणे नवीन स्वरूपात लॉन्च करण्यात आली. याच्या रॅडिकल, अॅरो-शॉट स्टाईलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ऑल-न्यू 1.5L i-VTEC इंजिनसह सुसज्ज, Honda City सर्वाधिक विक्री करणारी कार ठरली. 2008 मध्ये या कारमध्ये पुन्हा बदल करून लॉन्च करण्यात आली.
फोर्थ जनरेशन 2014-2020
Honda Cars ने 2014 मध्ये फोर्थ जनरेशन सिटी लॉन्च केली. Honda ची ही कार 1.5L i-VTEC पेट्रोल इंजिन सोबत 1.5L i-DTEC डिझेल इंजिन देखील सादर करण्यात आली होती. या जनरेशनची Honda City पूर्वीपेक्षा अधिक पॉवरट्रेन पर्याय, नवीनतम उपकरणे आणि नवीन इंटिरियर्ससह भारतात 25 वर्षे साजरी करत आहे.
5th जनरेशन 2020 ते आतापर्यंत
आताची 5 व्या जनरेशनची Honda City जुलै 2020 मध्ये सादर करण्यात आली. नवीन जनरेशनच्या या कारमध्ये जबरदस्त बदल करण्यात आले आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि डिझाइनसह ही कार लॉन्च करण्यात आली. यातच City e: HEV भारतातील पहिले हायब्रीड इलेक्ट्रिक मॉडेल भारतीय सेडान बाजारपेठेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.