एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रोबोटिक सर्जरीसाठी आता पुणे-मुंबईला जाण्याची गरज नाही, मराठवाड्यातही होणार शस्त्रक्रिया

रोबोटिक सर्जरीसाठी आता पुणे-मुंबईला जाण्याची गरज नसून औरंगाबादमध्ये ही शस्त्रक्रिया होणार आहे.शहरातील सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटलने मराठवाड्यात पहिल्यांदाच रोबोटिक सर्जरी युनिट सुरू केले आहे.

औरंगाबाद : रोबोटिक सर्जरीला वैद्यकीय क्षेत्रातील भविष्य म्हणून पाहिलं जातं. परंतु, ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे-मुंबईशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता मराठवाड्यात पहिल्यांदाच रोबोटद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शहरातील सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटलने मराठवाड्यात पहिल्यांदाच रोबोटिक सर्जरी युनिट सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात आता रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत जाण्याची गरज पडणार नाही. 

रोबोटिक सर्जरी (Robotic Surgery) वैद्यकीय विज्ञान विकासाचे जिवंत उदाहरण आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया प्रामुख्याने 5 प्रकारच्या आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:  

रोबोटिक गायनॉकॉलॉजिस्ट सर्जरी – काही महिलांसाठी, रोबोटिक गायनॉकॉलॉजिक सर्जरी (Robotic Gynecologic Surgery), ओपन शस्त्रक्रिया किंवा मानक लेप्रोस्कोपिक प्रक्रिया एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते.

ओपन व्हायोनोलॉजिस्ट सर्जरी (Open Gynecologic Surgery), ज्यामध्ये पोटावर एक चीर केली जाते. ज्यामुळे सर्जन गर्भाशय किंवा त्याच्या अवयवांना जवळून हाताळू शकेल.

रोबोटिक प्रोस्टेट सर्जरी – बऱ्याच अभ्यासात असे दिसून आले आहे की प्रोस्टेट कर्करोगासाठी सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक  रेडिकल प्रोस्टेटेक्टॉमी (Redical Prostatectomy) आहे.

रेडिकल प्रोस्टेटेक्टॉमी ही अशी प्रक्रिया आहे जी प्रोस्टेट आणि त्याच्या आसपासच्या कर्करोगाच्या ऊतकांना काढून टाकते.

रोबोटिक किडनी शस्त्रक्रिया – मधुमेह, कर्करोग, मूतखडा इ. अनेक परिस्थितींमध्ये मूत्रपिंड मुख्यत्वे खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत डॉक्टर मूत्रपिंड डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यक्रिया करण्याची शिफारस करतात. ही शस्त्रक्रिया रोबोटिक किडनी शस्त्रक्रिया (Robotic Kidney Surgery) नावाने ओळखले जाते.

रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरी – रोबोटिक कॉलेक्टॉमी सर्जरी दरम्यान, सर्जन कॉलोन (colon) आणि गुद्दाशय (rectum) कर्करोगाचे भाग काढून टाकतात.

रोबोट स्पाइन सर्जरी – रोबोटिक स्पाइन सर्जरी पाठ दुखी कमी करण्यासाठी केली जाते.

रोबोट सर्जरीचा फायदा काय आहे?  

  • अचूकता – रोबोटिक शस्त्रक्रियाचा मुख्य फायदा म्हणजे ही अगदी अचूक आहे.
  • कमी वेदना – ही शस्त्रक्रिया रोबोटच्या मदतीने केली जाते. त्यामुळे या काळात व्यक्तीला कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही.
  • लहान कट – इतर शस्त्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक शस्त्रक्रियेत एक छोटासा कट केला जातो. हे कट भरायला जास्त वेळ लागत नाही.
  • कमी जखम – अशा शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर कमी घाव होतात. त्यामुळे जखम मोठी होत नाही.
  • आरोग्यामध्ये जलद सुधारणा – रोबोटिक शस्त्रक्रियाचा दुसरा फायदा असा की यामध्ये रिकव्हरी वेगाने होते.

पुण्यातील प्रख्यात कॅन्सर तज्ञ व कॅन्सर सर्जन डॉक्टर शैलेश पुणतांबेकर हे रोबोटिक सर्जरी करण्यासाठी सिग्माच्या चमूमध्ये असणार आहेत. मराठवाड्यातील रुग्णांसाठी रोबोट सर्जरी ही अत्यंत फायदेशीर ठरणारी यंत्रणा आहे. या सर्जरीसाठी आता पुणे-मुंबई येथे जाण्याची गरज पडणार नाही, असा आशावाद डॉक्टर उमेश टाकळकर यांनी व्यक्त केला. तसेच नवनवीन तंत्रज्ञान सर्वप्रथम मराठवाड्यामध्ये आणून इथल्या लोकांची जनसेवा घडवण्याचा निरंतर उपक्रम चालू ठेवण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Barsu Refinery Special Report : कोकणातील रिफायनरी आणि प्रकल्पांचं काय होणार?Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Embed widget