MH-CET परीक्षेतील गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करा; धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी
Dhananjay Munde: पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याची धनंजय मुंडेंची मागणी.
MH-CET Exam: राज्यात 5 ते 20 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या MH-CET परीक्षेत झालेला गोंधळ, तांत्रिक बिघाड यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अर्धवट राहिले तसेच सतत लॉग आउट होणे यासारख्या असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या कंपनीवर तसेच सेलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे. तर लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करून नाहक खर्च करावा लागला, त्याला जबाबदार कोण, असा सवालही या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे
यावेळी बोलतांना मुंडे म्हणाले की, 6 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसलेले होते, तेव्हा कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे सेलकडून अपेक्षित होते. मात्र उलट घडले व 6 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला.दरम्यान विद्यार्थ्यांना सेलने पुन्हा परीक्षेला बसायची संधी दिली असून यासाठी अर्ज करावयास आज रात्री पर्यंतची मुदत देण्यात आलीय. त्यामुळे पुन्हा प्रक्रिया करायची, परीक्षेला जायचे याचा खर्च व झालेला त्रास याची नुकसानभरपाई विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.
उच्चस्तरीय चौकशी करा...
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरावर चौकशी करून तांत्रिक बिघाडाला जबाबदार कंपनी व संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करावी तसेच विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली मुदत वाढवुन द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयाची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
गोगलगायीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी...
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे 4 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायीनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यांवर मीठ टाकून त्यांना नष्ट करत मात्र, पुन्हा पेरणी केली ती तीच परिस्थिती. यामुळे तीन-चार पेरण्या करूनही गोगलगायीचे नियंत्रण नाही आणि पिकही हाती लागणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI